आजकाल सोशल मीडियावर लोक विमान, पायलट आणि विमानप्रवास याबाबत खूप काही शोधत आहेत.
विशेषतः एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर अपघातानंतर लोकांना पायलटबद्दल बरच काही जाणून घ्यायचं आहे, त्यापैकी त्याला पगार किती मिळतो हा एक कॉमन प्रश्न आहे.
पायलट होणं म्हणजे फक्त ग्लॅमर नाही, ही केवळ आकर्षक नोकरी नाही, तर अत्यंत जबाबदारीचं काम आहे.
यासाठी फक्त शिक्षणच नव्हे, तर कठोर प्रशिक्षण, अनुभव आणि मानसिक ताकद ही लागते.
आता त्यांच्या पगाराबद्दल बोलायचं तर, एअर इंडियासारख्या मोठ्या एअरलाइनमध्ये, बोईंग 787 सारखं मोठं विमान चालवणाऱ्या पायलटाचा मासिक पगार ₹8 लाख ते ₹10 लाख दरम्यान असतो.
पगारावर अनुभव, फ्लायिंग अवर्स, रँक (कॅप्टन की फर्स्ट ऑफिसर) आणि देशांतर्गत / आंतरराष्ट्रीय उड्डाण यांचा ही परिणाम होतो.
त्यामुळे प्रत्येक पायलटचा पगार वेगवेगळा असू शकतो.
पायलटला पगारासोबत ओव्हरटाइमसाठी अधिक पैसे, रात्री उड्डाणासाठी भत्ता, विदेशात थांबण्यासाठी वेगळा भत्ता, मेडिकल आणि विमा सुविधा, सुट्टीच्या दिवशी काम केल्यावर अधिक पैसे असं सगळं मिळतं.
पायलट बनणं जितकं ग्लॅमरस दिसतं, तितकंच जोखमीचं आहे. त्यांच्या मेहनतीला आणि समर्पणाला योग्य सन्मान देणं गरजेचं आहे.