भारतात कामाच्या वेळेचा नियम काय? ओव्हरटाइममध्ये कितव्या स्थानी?

अर्जेंटिना कायदेशीररित्या आठवड्याला ४८ तास काम केले जाते, कर्मचाऱ्यांना दररोज ३ तासांचा ओव्हरटाईम मर्यादित असून ओव्हरटाईमसाठी नियमित वेतनाच्या ५०% वेतन दिले जाते. तर सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्यांना अतिरिक्त १००% वेतन दिले जाते.

दक्षिण कोरिया आठवड्यातून ४० तास काम केले जाते, ओव्हरटाईम ८ तासांपेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त २००% वेतन दिले जाते. साप्ताहिक ओव्हरटाईम ५२ तासांपेक्षा अधिक असू शकत नाही.

भारत आठवड्यातून 48 तास काम करणे आवश्यक आहे. एका दिवसातील जास्तीत जास्त ओव्हरटाइम 2 तासांवर मर्यादित करणे आवश्यक आहे.

मेक्सिको कायदेशीररित्या आठवड्याला ४८ तास काम केले जाते, कर्मचारी दररोज ३ तास तर आठवड्याला ९ तास ओव्हरटाईम करू शकतो. ओव्हरटाईम करणाऱ्यांना नियमित तासाच्या तिप्पट वेतन दिले जाते.

जपान आठवड्यातून ४० तास काम केले जाते, सोमवार ते शुक्रवार ओव्हरटाईम केल्यासअतिरिक्त २५% वेतन दिले जाते. विकेंडला काम केल्यास अतिरिक्त ३५% वेतन दिले जाते.

स्पेन आठवड्याला ४८ तास काम केले जाते, रोज नऊ तास काम करणं बंधनकारक.

अमेरिका, लंडन आठवड्यातून ४० तास काम केले जाते, ओव्हरटाईम करणाऱ्यांना नियमित वेतनाच्या किमान १.५ पट दाराचे वेतन दिले जाते.

ब्राझील आठवड्याला ४४ तास काम करणे अनिवार्य, दोन तासांपेक्षा जास्त ओव्हरटाईम काम करू शकत नाही.

दक्षिण आफ्रिका आठवड्याला ४५ तास काम करणे अनिवार्य, आठवड्यातून १० तास ओव्हरटाईम करू शकता.