‘मोहोतरमा’ म्हणजे महिला…  मग उर्दूमध्ये पुरुषांसाठी कोणता शब्द?

‘मोहोतरमा’ हा शब्द तुम्ही अनेकदा सिनेमामध्ये ऐकला असेल. अनेक सिनेमे, गाणी किंवा शेरोशायरीमध्ये महिलांसाठी हा शब्द वापरल्याचं कानावर आलं असेल.

‘मोहोतरमा’ हा शब्द आदराने महिलांना संबोधण्यासाठी उर्दू भाषेमध्ये वापरला जातो.

‘मोहोतरमा’चा अर्थ साधारणपणे “मॅडम” किंवा “आदरणीय महिला” असा होतो.

गाणी, कविता आणि शायरीमध्ये महिलांची स्तुती अधिक केली जाते, त्यामुळे ‘मोहोतरमा’ सारखे महिलांशी संबंधित उर्दू शब्द लोकांच्या जास्त लक्षात राहतात.

पुरुषांची स्तुती फार कमी वेळा केली जाते, ज्यामुळे त्यांच्यासाठी वापरले जाणारे उर्दू शब्द फार कमी लोकांना माहित असतात.

महिलांना ‘मोहोतरमा’ म्हणतात तसं पुरुषांना उर्दूमध्ये ‘मोहोतरम’ असे संबोधले जाते.

‘मोहोतरम’चा अर्थ साधारणपणे “आदरणीय” किंवा “सर” असा होतो.

हे दोन्ही शब्द उर्दू भाषेतील दुसऱ्या व्यक्तीबद्दलचा आदर आणि श्रद्धा दर्शवतात.

मग आता तुम्हाला पुरुषांना आदराने संबोधण्यासाठी ‘मोहोतरम’ हा एक महत्त्वाचा उर्दू शब्द नक्कीच माहित झाला आहे.