शरीराचा कोणता भाग अंत्यसंस्कारानंतरही जळत नाही? 

श्रीमद्भागवत गीतेनुसार, या जगात जो कोणी जन्माला येतो, त्याला एक दिवस मृत्यू निश्चित असतो.

पण तरीही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने सगळ्यांनाच दुखं होतं.

सनातन धर्मात मृत्यूनंतर, मृतदेशाला विधीनुसार दहन केले जाते आणि त्याला अग्नीत नेले जाते.

काही काळानंतर शरीर जळून मातीत विलीन होते. पण तुम्हाला माहिती आहे का की शरीराचा एक भाग असा आहे जो अंत्यसंस्कारानंतरही जळत नाही.

फार कमी लोकांना शरीराच्या या अवयवाबद्दल माहिती असेल. खरंतर त्यामागे सायन्स देखील आहे.

हा अवयव आहे व्यक्तीचे दात.

या आगीत दाताचा मऊ भागही जळून जातो. पण त्याचा कठीण भाग, ज्याला इनॅमल म्हणतात, तो बऱ्याचदा तसाच राहतो.

खरंतर दात कॅल्शियम फॉस्फेटपासून बनवले जातात. त्यामुळे हा पदार्थ इतका घन मानला जातो की आगही त्याला जाळू शकत नाही.

हेच कारण आहे की अंत्यसंस्कारानंतरही दात जळत नाहीत, तर शरीराचा उर्वरित भाग राखेत बदलला जातो.