रस्त्याने प्रवास करताना आपल्याला टोल नाका लागतो, काही लोक याला टोल प्लाझा देखील म्हणतात.
रस्त्यावरून प्रवास केल्याबद्दल तुम्हाला येथे शुल्क आकारले जाते.
कधी कधी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की हे टोल-नाकावाले दिवसाला किती पैसे कमावत असतील. पण या सगळ्यात तुम्हा असा प्रश्न पडलाय का की भारतातील कोणता टोलनाका सर्वाधिक पैसे कमावतो?
भरथाना टोल प्लाझा हा देशात सर्वाधिक महसूल गोळा करतो
दिल्ली ते मुंबई जोडणाऱ्या मार्गावर गुजरातमधील राष्ट्रीय महामार्ग-48 च्या वडोदरा-भरूच विभागात हा टोलनाका आहे.
गेल्या पाच वर्षांत या टोल प्लाझाने सरासरी वार्षिक 400 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. आकडेवारीनुसार, 2019 ते 2024 या कालावधीत या टोल प्लाझाचे एकूण उत्पन्न 2044 कोटी रुपये आहे.
भरथाना टोल प्लाझा हा देशातील सर्वाधिक वर्दळीचा टोल प्लाझा आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये या टोल प्लाझाने सर्वाधिक महसूल मिळवला होता. गेल्या आर्थिक वर्षात टोल प्लाझावर 472.65 कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला होता.
भरथाना टोल प्लाझावर कार, जीप किंवा व्हॅनने प्रवास करणाऱ्या लोकांना एकेरी प्रवासासाठी 155 रुपये टोल भरावा लागतो आणि जर दोन्ही बाजूंनी प्रवास करायचा असेल तर 230 रुपये टोल भरावा लागतो.
बस किंवा ट्रकसाठी, एकेरी प्रवासासाठी 515 रुपये आणि दोन्ही बाजूंनी 775 रुपये टोल भरावा लागतो.