जगातील सर्वात महागडं फळ कोणतं?

आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्रश्न घेऊन आलो आहोत, ज्याचे उत्तर मनोरंजक आहे.

तुम्हाला जगातील सर्वात महागड्या फळाचे नाव माहित आहे का?

जगातील सर्वात श्रीमंत लोकांनाही हे फळ रोज खाणे शक्य नाही

युबरी टरबूज असे या फळाचे नाव असून त्याची किंमत सोन्या इतकी आहे.

जपानमधील होक्काइडो या मोठ्या बेटावर हे टरबूज पिकवले जाते.

याला जगातील सर्व टरबूजांचा राजा म्हटले जाते, त्याची चव अगदी अनोखी आहे.

या टरबूजाचा आतील भाग केशरी रंगाचा असतो, तर बाहेरचा भाग किंचित हिरवा असतो.

युबारीच्या सालावर पांढरे पट्टे असतात, टरबूजाचे सरासरी वजन 2.5 ते 3 किलो असते.

युबरी टरबूजची किंमत भारतीय रुपयांमध्ये सुमारे 20,000 रुपये प्रति किलो आहे