Whisky आणि whiskey दोन्ही बाटल्या बाजारात, कोणती बनावट?

कोणतीही गोष्ट बनावट आहे किंवा खरी आहे हे त्याच्या स्पेलिंगवरुन ओळखने शक्य असते.

कारण बनावट गोष्टींची स्पेलिंग इकडे तिकडे लिहिलेले असतात किंवा एखादा शब्द जास्त लिहिलेला असतो.

शुज, कपडे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत असंच आहे. ज्यामध्ये adidas, reebok सारख्या ब्रँडबद्दल तुम्हाला माहित असेल.

त्यात आता बाजारात दोन वेगवेगळ्या स्पेलिंगच्या दारुच्या बाटल्या मिळत आहेत.

अशात बनावट दारु विकण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. त्यामुळे यात खरी दारु कोणती? अशा पेचात लोक पडले आहेत.

खरंतर दोन्हीपैकी कोणतीच ड्युप्लिकेट किंवा बनावट नाही. तुम्ही दुकानातून दोन्ही दारु विकत घेऊ शकता.

खरंतर स्पिलिंग मधील फरक हा वेगवेगळ्या भागात मिळणाऱ्या दारुवर आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्पेलिंग असलेली ही दारु वेगवेगळ्या भागात मिळते म्हणून त्यामध्ये फरक आहे.

स्कॉटलंड आणि त्यासारख्या देशांमध्ये ‘Whisky’ असा उल्लेख केला जातो.

तर आयर्लंड आणि अमेरिकेमध्ये ‘Whiskey’ असं लिहिलं जातं. शिवाय दोन्ही प्रकारांत दारुची चव आणि प्रक्रिया पद्धत वेगवेगळी असते.

त्यामुळे आता तुम्हाला बाजारात यांपैकी कोणतीही स्पलिंग दिसली तर न घाबरता तुमच्या चवीप्रमाणे आवडेल ती दारु विकत घ्या.