Whisky की Beer कोणतं कमी नुकसानकारक?

प्राचीन काळात काही अल्कोहोलिक पेये औषध म्हणून वापरली जात होती, परंतु आजच्या काळात बिअर आणि व्हिस्की हे दोन लोकप्रिय पर्याय आहेत.

या दोघांपैकी कोणती दारु आरोग्यासाठी कमी हानिकारक आहे? या बद्दल नेहमीच या दोन्ही मद्यप्रेमींच्या गटामध्ये चर्चा होत असते.

बिअरमध्ये 4-6% अल्कोहोल असते, तर व्हिस्कीमध्ये 40% किंवा त्याहून अधिक अल्कोहोल असतो

बिअरच्या एका पाइंटमध्ये 150-200 कॅलरीज असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. तर व्हिस्कीच्या एका शॉटमध्ये (30 mL) सुमारे 70 कॅलरीज असतात, कमी कॅलरीजमुळे वजन नियंत्रणात रहातं

बिअरमध्ये पॉलिफेनॉल्स आणि B जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. व्हिस्कीमध्ये एलाजिक ऍसिड सारखा शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतो, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो.

जास्त प्रमाणात बिअर पिणं यकृतावर ताण आणू शकते. त्याचबरोबर, बिअरमध्ये सिलिकॉन असतो ज्यामुळे हाड मजबूत होतात, पण हा फायदा फक्त थोड्या प्रमाणात मद्यपान केल्याने मिळू शकतो.

व्हिस्की, जरी अधिक स्ट्राँग असली तरी मध्यम प्रमाणात घेतल्यास त्याचा एकूण अल्कोहोलचा प्रभाव कमी पडतो.

तज्ञ म्हणतात की, कोणतंही अल्कोहोलिक पेय आरोग्यासाठी चांगलं नाही त्यामुळे त्याचं केव्हाही कमी प्रमाणात सेवन केलं तर ते कमी नुकसानकारक ठरु शकतं.

(वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)