मगरीच्या अश्रूंना खोटं खोटं रडणं का म्हणतात?
मगरीचे अश्रू हा एक प्रसिद्ध वाक्प्रचार आहे
पण याला लोक खोटं खोटं रडणं असं म्हणतात असं का?
जे लोक खोटं रडतात किंवा खोटं पश्चाताप झाला असं दाखवतात त्यासाठी हा वाक्यप्रचार वापरला जातो.
पण याचा संबंध मगरीच्या अश्रूंशी का लावला जातो? याबद्दल फार कमी लोकांना माहित असेल.
जेव्हा माणूस दु:ख किंवा शोक व्यक्त करतो तेव्हा अश्रू बाहेर पडतात.
पण काही लोकांच्या रडण्याला मगरीची अश्रू का म्हणतात?
खरंतर शिकार पाहिल्यानंतर मगरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
जेव्हा ते अन्न खातात तेव्हा हे अश्रू ग्रंथीमध्ये ताण पडल्यामुळे बाहेर येतात.
यामुळेच त्यांच्या अश्रूंचा संबंध हा खोटं रडणं किवा फसवणूक करणं याच्याशी जोडलं जातं.