नेहमी ‘V’ आकारात का उडतात पक्षी? कधी प्रश्न पडलाय?

कधी पक्ष्यांच्या थव्याकडे लक्ष दिलंय? ते नेहमी ‘V’ आकारातच का उडतात याचा विचार केलाय का?

हे योगायोग नसून ‘V’ आकारात उडण्यामागे ठोस शास्त्रीय कारणं आहेत.

‘V’ शेप मध्ये उडल्यामुळे विरुद्ध वाऱ्याला चिरून पुढे जाणं पक्ष्यांसाठी सोपं होतं.

झुंडीतील पहिला पक्षी हवा चिरतो आणि मागच्यांना त्या प्रवाहाचा फायदा मिळतो. त्यामुळे थोड्या ऊर्जा खर्चात पक्षी लांब उडू शकतात.

थकलेला लीड पक्षी मागे जातो आणि दुसरा पक्षी नेतृत्व करतो, हे नेतृत्व सतत बदलतं.

या पद्धतीमुळे कोणत्याही एका पक्षावर लांबच्या प्रवासात भार येत नाही आणि सर्वांची ताकद देखील खर्च होत नाही.

‘मी लीडर असेन’ असा अहंभाव या पक्ष्यांमध्ये नसतो, जो निसर्गाचा अनोखा संदेश. जे पक्षी पहिले उडतील ते पुढे रहातील.

‘V’ आकार केवळ सौंदर्य नाही तर ऊर्जा व्यवस्थापनाचं सर्वोत्तम उदाहरण आहे.

हे एक चतुर, नैसर्गिक आणि सहकार्याने भरलेलं उडण्याचं शास्त्र आहे.