लिफ्टमधील आरसा सर्वसामान्यासाठी रहस्य, खरं कारण तुम्हाला हैराण करेल
मोठ-मोठ्या शहरांमध्ये उंचच उंच इमारती असतात, ज्यांना सहाजिकच लिफ्ट असतात. ज्यांना एलिवेटर देखील म्हणतात. अनेक मॉल्समध्ये देखील लिफ्ट असतात.
या लिफ्ट आकाराने किंवा डिझाइन प्रमाणे एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात. पण बहुतांश लिफ्टमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे त्यातील आरसा.
पण तो का लावला जातो यामागचं कारण तुम्हाला माहितीय?
बहुतांश लोकांचा असा समज आहे की कामाच्या ठिकाणी किंवा चार चौघात जात असताना आपण कसं दिसतोय? हे पाहण्यासाठी आरसे असतात पण तसं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या काळात लिफ्टमध्ये आरसे लावले जात नव्हते.
पण जेव्हा एखादी व्यक्ती लिफ्ट वापरत असे तेव्हा त्याची एक तक्रार होती की, लिफ्टचा वेग सामान्यपेक्षा खूप जास्त होता.
या कारणामुळे लोकांना खूप अस्वस्थ वाटू लागले. यासाठी लिफ्टचा वेग थोडा कमी असावा असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर कंपनीच्या डिझायनर आणि अभियंत्यांनी त्यावर युक्ती लावली आणि आतमध्ये आरसे लावले.
आता आरशामुळे लिफ्ट सुरु झाल्यावर आतमधील लोकांचे लक्ष लिफ्टच्या स्पीडवर जाणार नाही.