डासांना रक्त मिळालं नाही तर ते किती दिवस जिवंत राहातात?
सर्व डास रक्त पितात असं सगळ्यांना वाटतं? पण हे खरं नाही
डासांचं आयुष्य, त्यांची खाण्याची पद्धत आणि रक्ताशिवाय जगण्याची क्षमता यामागचं विज्ञान वेगळंच आहे.
नर डास हे कधीच रक्त पित नाहीत. ते फक्त फुलांचा रस आणि गोड पदार्थांवर जगतात.
त्यामुळे रक्त पिणारे डास हे मादी डास असतात. ते अंडी घालण्यासाठी लागणारं प्रोटीन मिळवण्यासाठी रक्त पितात.
पण असं असलं तरी मादी डास देखील पुरुष डासांप्रमाणे फुलांच्या रसावर जिवंत राहू शकते.
नर डास 4–7 दिवस जगतो
तर मादी डास रक्ता शिवाय एखादा आठवडा, तर रक्त प्यायल्यावर 2 ते 4 आठवडे जगते.
डास थंड आणि दमट हवामानात जास्त दिवस जगतात, तर जास्त गरमी किंवा थंडीत पटकन मरतात
डासांपासून बचाव करण्यासाठी घरात पाणी साचू देऊ नका, मच्छरदाणी वापरा, नियमित मच्छर नियंत्रणात ठेवा.