रात्रीचे कुत्रे का रडतात?

रात्री कुत्र्यांच्या रडण्याबद्दल लोकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत.

काही लोकांना वाटतं की कुत्र्याचं रडणं हे अशुभ आहे तर काहीजण यामागे मागील शास्त्रीय कारण असल्याचं सांगतात.

काहीतरी वाईट घडण्याची चाहूल कुत्र्यांना आधीच लागते म्हणून ते रडतात अशी मान्यता आहे. गावाकडील भागात कुत्र्याच्या रडण्याला नकारात्मक संकेत मानले जाते.

पण कुत्र्याच्या रडण्याबद्दल सायन्स काही वेगळंच सांगतं. कुत्र्यांच्या रात्रीच्या रडण्यामागे त्यांची काही शारीरिक समस्या असू शकते.

जर एखादा कुत्र्या काही दुखत असेल किंवा तो आजारी असेल, तर त्याला वेदना सहन न झाल्यामुळे तो रडू लागतो.

कुत्रे त्यांच्या समूहातील इतर कुत्र्यांशी संवाद साधण्यासाठी रात्री रडतात. हा त्यांच्या विशिष्ट प्रकारचा आवाज त्यांच्या समुहातील कुत्र्यांना संकेत पोहोचवतो.

रात्री थंडी वाढल्यास काही कुत्रे अस्वस्थ होतात आणि रडू लागतात. तसेच, जर त्यांना वेळेवर अन्न मिळालं नाही, तर ते उपासमारीमुळे रात्री रडणे सुरू करतात.

कुत्रे हे भावनीक देखील असतात, त्यांना जर त्यांचं घर किंवा माणसं सोडून जावं लागलं असेल तरी देखील ते दुःखी होऊन रडू लागतात.

कुत्र्यांचे रात्री रडणे केवळ अंधश्रद्धा नाही, त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. त्यामुळे एखादा कुत्रा रात्री रडत असेल तर तिथून निघून न जाता किंवा न घाबरता त्याला आजार, भूक किंवा इतर कोणतीही समस्या आहे का, हे तपासणं गरजेचं आहे.