गंगा ही भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. भारतात गंगेला देवीचं स्थान दिलं आहे.
उत्तराखंडमधील गोमुखातून उगम पावलेली गंगा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधून बांगलादेशातील बंगालच्या उपसागराला मिळेपर्यंत 2,525 किलोमीटरचा प्रवास करते.
गंगेत स्नान केल्याने सर्व पाप धुऊन जातात असं म्हणतात. गंगाजलाचे एक अद्भुत वैशिष्ट्य आहे की ते वर्षानुवर्षे खराब होत नाही किंवा त्या पाण्याला कधी दुर्गंधीही येत नाही.
पण या मागचे कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
वास्तविक, गंगेच्या पाण्यात सुमारे 1000 प्रकारचे ‘बॅक्टेरियोफेज’ आढळतात. हे ते व्हायरस आहेत जे जीवाणू नष्ट करतात.
यासोबतच गंगेच्या पाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता खूप जास्त आहे.
इतर नद्यांच्या तुलनेत गंगा 20 पट घाण शोषू शकते. गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याचे कुजण्यापासून संरक्षण होते.
गंगा नदी हिमालयातून उगम पावते आणि वाटेत अनेक प्रकारच्या वनौषधी आणि खनिजांमधून जाते.
हेच कारण आहे की गंगाजल हे केवळ आपल्या धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर ते आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.