टोलनाक्यावर पैसे का भरावे लागतात? कोणत्या राज्यात जास्त Toll?

आज जवळजवळ प्रत्येकाकडे दोन किंवा चारचाकी गाडी आहे. प्रवास, काम आणि फिरण्यासाठी रस्त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

परंतू कारने लांबचा प्रवास करताना आपल्याला रस्त्यावर टोल भरावा लागतो. पण तो का भरावा लागतो असा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवतो.

हा टोल शुल्क रस्त्यांच्या बांधकाम, देखभाल आणि दुरुस्तीसाठी घेतलं जातं. टोलमधून जमा झालेला पैसा राष्ट्रीय महामार्ग, फ्लायओव्हर, सर्विस लेन आणि नवीन रस्ते उभारण्यासाठी वापरला जातो.

आज भारतात हजाराहून अधिक टोल प्लाझा आहेत. पण तुम्हाला माहितीय का की कोणत्या राज्यात सर्वात जास्त टोल प्लाझा आहेत?

भारतामध्ये सर्वाधिक टोल प्लाझा राजस्थान राज्यात आहेत. येथे तब्बल 156 टोल प्लाझा आहेत.

राजस्थानाचं क्षेत्रफळ मोठं, वाळवंट भाग मोठ्या प्रमाणात आणि रस्त्यांचं जाळं विस्तृत असल्यामुळे. इथे टोल प्लाझा जास्त आहे.

दिल्ली-जयपूर (NH-48) आणि गुजरात-मध्य प्रदेशला जोडणारे आंतरराज्यीय रस्ते राजस्थानमधून जातात.

टोलमधून मिळालेला पैसा रस्त्यांचा दर्जा वाढवतो, ग्रामीण रस्त्यांचं जाळं जोडतो आणि प्रवास सोयीस्कर करतो.

फास्टॅग आणि जीपीएस आधारित टोल वसुलीमुळे वेळेची बचत होते. वारंवार प्रवास करणाऱ्यांना वार्षिक पासची सोयही उपलब्ध आहे.