फॉरेनला जाणारी ट्रेन
21 दिवसांत 13 देश,
राहणं-खाणं फ्री
परदेशात जायचं म्हटलं की
विमान प्रवास पण तुम्हाला माहितीये
एक ट्रेन जी जग फिरवते.
जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवास
18755 किमी अंतर
आणि 21 दिवसांचा.
ही ट्रेन
13 वेगवेगळ्या देशांमधून जाते,
11 मुख्य स्टेशन्सवर थांबते.
ही ट्रेन थांबते ती रात्रभर,
प्रवाशांना उतरून
त्या ठिकाणी फिरायलाही मिळतं.
यात स्पेन, फ्रान्स, रशिया,
चीन, व्हिएतनाम, थायलंड,
सिंगापूरसारखी ठिकाणं आहेत.
एकदा तिकीट बुक केलं की
त्यातच खाण्यापिण्याची,
राहण्याचीही सोय होते.
या रेल्वे तिकिटाची किंमत
अंदाजे 1350 डॉलर
म्हणजे 114000 रुपये आहे.
पोर्तुगालच्या अल्गार्वेमधून
ही ट्रेन सुटते,
सिंगापूर हे त्याचं शेवटचं ठिकाण.