जगातलं सर्वात महाग खरबूज, किंमत हिऱ्यापेक्षा जास्त
खरबूज या फळाविषयी तुम्ही ऐकलंच असेल ज्याची किंमत साधारण 100 रुपये प्रति किलो असते.
जगात असं खरबूज आहे ज्याच्या किंमत हिऱ्यापेक्षा जास्त आहे. यामध्ये काय खास आहे याविषयी जाणून घेऊया.
या महागड्या खरबूजाचं नाव युबरी मेलन आहे. याला युबरी किंग म्हणूनही ओळखलं जातं.
जपानमध्ये या फळाची लागवड होते आणि लिलावही.
युबरी मेलनची शेती फक्त जपानमध्येच केली जाते. या पिकाची शेती जपानमधल्या होकॅडो द्वीपावरच्या युबरी शहरातच केली जाते.
युबरी शहरात शेती होत असल्यानं याला युबरी मेलन म्हटलं जातं.
सर्वांत विशेष गोष्ट म्हणजे युबरी मेलनची विक्री होत नाही त्याचा लिलाव केला जातो.
2022मध्ये एका युबारी किंग खरबुजाचा लिलाव 20 लाख रुपयांत झाला होता.
याची लागवड अत्यंत कमी क्षेत्रावर असल्यानं त्याचं उत्पादन कमी होतं आणि म्हणूनच ते महाग फळ आहे.