TRENDING:

Govinda: अभिनेता गोविंदाने सोडलं राजकारण, नेमकं कारण काय?

Last Updated:

Govinda Exit Politics: अभिनेता गोविंदा अहुजाने आपल्या मुलांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने माध्यमांना प्रतिक्रिया देत राजकारणातून एक्झिट घेत असल्याची माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनेता गोविंदा अहुजा सध्या खासगी आयुष्यामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. अशातच अभिनेत्याने आपल्या मुलांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने माध्यमांना प्रतिक्रिया देत राजकारणातून एक्झिट घेत असल्याची माहिती दिली आहे. अभिनेता गोविंद अहुजा याने एएनआय ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ही महत्त्वाची घोषणा केली आहे. मुलगा यशवर्धन अहुजा आणि मुलगी टीना अहुजा यांच्या भविष्याकडे अभिनेता लक्ष देणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Govinda: अभिनेता गोविंदाने सोडलं राजकारण, नेमकं कारण काय?
Govinda: अभिनेता गोविंदाने सोडलं राजकारण, नेमकं कारण काय?
advertisement

नुकतंच अभिनेता गोविंदा अहुजाने एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने स्पष्ट केलं की, "मी माझ्या फॅमिलीसाठीच राजकारणातून एक्झिट घेतली आहे. मी निर्माते नाडियाडवाला यांना सांगितलं की, तुम्ही माझ्या मुलाला चित्रपट कसे बनवायचे? याबद्दलचे ज्ञान द्या. शिवाय त्याला अभिनयाचेही धडे द्याल. माझं सर्वाधिक लक्ष राजकारणातच होतं. त्यामुळे माझं माझ्या फॅमिलीकडे दुर्लक्ष होत होतं. म्हणून मी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मैत्री, प्रेम आणि लग्न! पुणेकर समीर–अमित जिंकले पण...,संघर्ष कधी संपणार? Video
सर्व पहा

गेल्या अनेक दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेता गोविंदाने मुलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुलगा आणि मुलीच्या दृष्टीने अभिनेत्याने राजकारण सोडलं आहे. राजकारणाचा कुटुंबावर परिणाम होऊ नये, यासाठी अभिनेत्याने महाराष्ट्राच्या राजकारणातून एक्झिट घेतल्याचे बोलले जात आहे. अभिनेता गोविंदाने मार्च 2024 मध्ये म्हणजेच 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला होता. गोविंदाने लोकसभा निवडणूकीच्या वेळी आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळीही प्रचारासाठी उपस्थिती लावली होती. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अभिनेत्याने सभेमध्ये भाषणही केलं होतं. अभिनेत्याच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda: अभिनेता गोविंदाने सोडलं राजकारण, नेमकं कारण काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल