Valentine Special Story : मैत्री, प्रेम आणि लग्न! पुणेकर समीर–अमित जिंकले पण...,संघर्ष कधी संपणार? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पुण्यातील LGBTQ कम्युनिटीतील समीर आणि अमित यांची लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत.
पुणे: फेब्रुवारी हा महिना प्रेमाचा मानला जातो. या महिन्यात विविध डे साजरे केले जात असले तरी तरुणाईला सर्वाधिक प्रतीक्षा असते ती व्हॅलेंटाईन डेची. या दिवशी अनेक जण आपले प्रेम खुलेपणाने व्यक्त करतात. खरं तर प्रेमाला जात, धर्म किंवा लिंगाची कोणतीही मर्यादा नसते. प्रेम ही एक निस्वार्थ भावना आहे. मात्र, आजही समाजात या भावनांचा पूर्णपणे स्वीकार केला जात नाही. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पुण्यातील LGBTQ कम्युनिटीतील समीर आणि अमित यांची लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. समाजातील विरोध, अडचणी आणि मानसिक संघर्ष असूनही त्यांनी एकमेकांच्या सोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला.
समीर समुद्र आणि अमित गोखले यांनी सांगितलं की प्रेम हे सगळ्याचं सारखं असतं पण त्या प्रेमाचा समाज अजुनही स्वीकार करत नाही. आजच्या बाबतीत LGBTQ कम्युनिटीतील असल्यामुळे समाजाने आमच्या प्रेमाला लवकर स्वीकारलं नाही .अजूनही समाजातील दुय्यम वागणुकीचा सामना करावा लागते. मुलां - मुलांचं लग्न कुठे असतं का ? तुम्ही मुलींशी लग्न करा अश्या अनेक प्रश्नाचा सामना करावा लागला. आम्ही एकमेकांवर मनापासून प्रेम करत होतो. पण प्रेम ते लग्न हा प्रवास सोपा नव्हता कुटुंबांना सांगणं ही देखील एक प्रकारची परीक्षा होती. कारण आम्ही दोघेही उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांच्याशी अपेक्षा होती की मुलीशी लग्न करून सेटल व्हावं. हे सांगितलं सुरुवातीला त्यांना थोडा धक्का बसला पण नंतर त्यांनी याविषयी वाचायला सुरुवात केली आणि काही कालावधीनंतर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, असं ते सांगतात.
advertisement
या नात्याची सुरुवात कशी झाली?
समीर समुद्र यांनी सांगितले की ते अमेरिकेत नोकरी करत होते, तर अमित गोखले उच्च शिक्षणासाठी आले होते. एका ऑनलाइन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून दोघांचा पहिल्यांदा संपर्क झाला. अमित गोखले यांनी पाठवलेल्या मेलला समीर यांनी रिप्लाय दिला. यानंतर 2003 साली दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. समान सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि दोघेही महाराष्ट्रातून असल्यामुळे विचार आणि आवडी जुळत गेल्या. या ओळखीचे पुढे मैत्रीत, तर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालं. 2010 साली अमेरिकेत दोघांनी विवाह केला. त्यानंतर 2014 साली त्यांच्या विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्यात आली. मात्र, या दोन्ही प्रसंगी कुटुंबीय उपस्थित राहू शकले नाहीत. अखेर 2024 साली कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पुण्यात पुन्हा लग्न केलं.
advertisement
कायदेशीर लढाई अजूनही सुरूच
समलैंगिक संबंधांना गुन्हा मानण्याची तरतूद 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. मात्र, त्यानंतरही समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर समीर आणि अमित गोखले यांनी गे मॅरेज सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विवाहासाठी जे अधिकार आणि प्रमाणपत्रे मिळतात, ती आम्हालाही मिळावीत, यासाठी आमची कायदेशीर लढाई सुरू असल्याचं समीर यांनी सांगितलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 4:24 PM IST
मराठी बातम्या/लव स्टोरी/
Valentine Special Story : मैत्री, प्रेम आणि लग्न! पुणेकर समीर–अमित जिंकले पण...,संघर्ष कधी संपणार? Video





