PPF स्किमध्ये दरवर्षी 50 हजार रुपये जमा केल्यास मॅच्योरिटीवर किती मिळतील? पाहा गणित
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
पीपीएफ स्किममध्ये अनेक भारतीय गुंतवणूक करतात. कारण यामध्ये फिक्स्ड रिटर्न मिळतं. यासोबतच कोणती जोखिमही नसते. चला आज आपण या स्किमविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Post Office PPF Scheme: आपण कमाई करत असलेल्या पैशांतील काही पैसे आपण सेव्हिंगमध्ये टाकतो. पैसे सेव्ह करताना ते सुरक्षित ठिकाणी असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. यामुळे सरकारने देशातील सामान्य लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी अनेक प्रकारच्या बचत योजना सुरू केल्या आहेत. यामधील एक म्हणजे पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडेंट फंड स्किमही आहे. ती केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी स्किम आहे.
advertisement
पीपीएफ ही दीर्घकाळापासून सुरू असलेली प्रसिद्ध बचत स्किम आहे. पीपीएफवर सध्या 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळतं. पण तुम्ही पीपीएफ स्किममध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला एका वर्षात किमान एकदा पैसे जमा करावे लागतात. यासाठी तुम्ही तुमच्या सुविधेसाठी अकाउंटमध्ये दरवर्षी एकरकमी पैसा जमा करू शकतात. किंवा मग जास्तीत जास्त 12 हप्त्यांमध्ये पैसा जमा करू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









