Bigg Boss Marathi 6 : लांब व्हा! टिकिट टू फिनालेसाठी त्या दोघांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : या टास्कमुळे दोन स्पर्धकांमधील वाद इतका टोकाला जातो की तो हाणामारीपर्यंत पोहोचतो. दोघांवर बिग बॉसही संतापले.
बिग बॉस मराठी 6 आता अंतिम टप्प्यांत आला आहे. घरातील वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. फिनाले अगदी जवळ आला असताना 'टिकिट टू फिनाले'साठी स्पर्धकांमध्ये चुरस वाढली आहे. अशातच नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरात मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळणार आहे. या टास्कमुळे दोन स्पर्धकांमधील वाद इतका टोकाला जातो की तो हाणामारीपर्यंत पोहोचतो. दोघांवर बिग बॉसही संतापले.
या आठवड्यात बिग बॉसने घरातील सदस्यांना एक वेगळा टास्क दिला. घरात प्रत्येक सदस्याचा फोटो टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आला. या टास्कनुसार स्पर्धकांना एखाद्या सदस्याचा टीव्ही फोडायचा होता. ज्यांचा टीव्ही फुटेल त्यांचं फिनालेत जाण्याचं स्वप्न तुटणार आहे.
advertisement
या टास्कदरम्यान राकेशने विशालला नॉमिनेट करत त्याचा टीव्ही फोडला. यावेळी राकेश म्हणाला, "माझं नाव आहे विशाल. पर्सनल लाइफबद्दल बोलणं मला चुकीचं वाटलं." राकेशच्या निर्णयानंतर विशाल चांगलाच संतापला. तो म्हणाला, "तू माझ्या एजबद्दल बोलतोस ते पर्सनल नाहीये का? डिवोर्स काय झाला?" या वक्तव्यामुळे वाद अधिकच चिघळला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली.
advertisement
यानंतर राकेश बाहेर येत विशालसोबत जोरदार भांडण करतो. "डिवोर्स का काढतोस?" असा सवाल करत तो विशालवर संतापतो. त्यावर विशालही मागे हटत नाही आणि म्हणतो, "तू का काढतोस?" या दोघांमधील वाद इतका वाढतो की ते एकमेकांच्या अंगावर धावून जातात. काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हं दिसू लागतात.
advertisement
दोघांमधील वाढता तणाव पाहून घरातील इतर सदस्य लगेच मध्ये पडतात आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. सर्वजण मिळून त्यांचं भांडण सोडवतात. या दरम्यान घरात पूर्ण गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं असतं.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून बिग बॉस तात्काळ हस्तक्षेप करतात. ते कडक शब्दांत आदेश देतात, "राकेश आणि विशाल, लांब व्हा." या आदेशानंतर दोघांनाही वेगळं करण्यात येतं. बिग बॉसच्या घरात आता पुढे काय घडणार हे आजच्या एपिसोडमध्येच कळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 9:50 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : लांब व्हा! टिकिट टू फिनालेसाठी त्या दोघांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले








