advertisement

Sugarcane Juice Facts : उसाच्या रसाच्या एका ग्लासमध्ये किती चमचे साखर असते? तज्ज्ञांनी सांगितलेला आकडा वाचून घाबराल!

Last Updated:

Sugarcane juice disadvantages : उसाच्या रसाच्या एका ग्लासमध्ये किती चमचे साखर असते, तुम्हाला माहितीये? तुम्ही नकळत किती चमचे साखर खाताय हे वाचून तुम्हाला भीती वाटू शकते.

जास्त प्रमाणात उसाचा रस प्यायल्याने होऊ शकतात दुष्परिणाम
जास्त प्रमाणात उसाचा रस प्यायल्याने होऊ शकतात दुष्परिणाम
मुंबई : उन्हाळ्यात जितक्या सहज आपण शहाळं पितो तितक्याच सहज आपण उसाचा रस पितो. उसाचा रस आपल्याला उन्हाळ्यात गारवा देतो, हायड्रेट करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उसाचा रस प्यायल्यानंतर आपल्याला क्षणांत फ्रेश वाटतं आणि इन्स्टंट एनर्जी येते. पण उसाचा रस आपल्यासाठी खरंच इतका हेल्दी असतो का?
उसाच्या रसाच्या एका ग्लासमध्ये किती चमचे साखर असते, तुम्हाला माहितीये? तुम्ही नकळत किती चमचे साखर खाताय हे वाचून तुम्हाला भीती वाटू शकते. याबद्दल 'अमुक-तमुक' या पॉडकास्टमध्ये क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. अमिता गद्रे यांनी माहिती दिलीय. त्यांनी सांगितलं की, आपण नकळत किती साखर कळतो, हे खूप लोकांच्या लक्षातच येत नाही.
डॉ. अमिता यांनी संगितलं की, एकीकडे लोक साखर खाणं बंद करतात किंवा कमी करतात. पण दुसरीकडे ग्लासभर उसाचा रस एकाचवेळी पितात. आपल्या हे लक्षात येत नाही की, साखर उसापासूनच बनते. त्याच्या नावातच साखर आहे. उसाचा रस आपण जो उसाचा रस घेतो, त्याच्या एका ग्लास मध्ये म्हणजे 200Ml च्या एका ग्लासमध्ये तब्बल 7 चमचे साखर असते.
advertisement
एवढी साखर आपण एकाच वेळी एका उसाच्या रसामधून घेतो. आपण जर 7 चमचे साखर सॉलिड फॉर्ममध्ये खायचं ठरवलं तर ते आपल्याला शक्य होत नाही. कारण एका चमच्यानंतरच ती आपल्याला इतकी गोड लागते की त्यापेक्षा जास्त आपल्याला ती खाल्ली जात नाही. पण उसाचा रस म्हणजे लिक्विड फॉर्ममधली साखर. या लिक्विड कॅलरीज आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर होईपर्यंत म्हणजे आपल्या मेंदूला कळेपर्यंत आपण संपूर्ण ग्लास संपवलेला असतो.
advertisement
advertisement
जास्त प्रमाणात उसाचा रस प्यायल्याने होऊ शकतात हे दुष्परिणाम..
- उसाच्या रसात साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणून तो जास्त प्रमाणात प्यायल्यास लठ्ठपणा आणि रक्तातली साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
- रस्त्याच्या कडेला उघडपणे विकल्या जाणाऱ्या उसाच्या रसात जिवाणू आणि घाण असू शकते. यामुळे पोटाच्या आजारांचा धोका वाढतो.
- काही लोकांना उसाचा रस प्यायल्यानंतर पोट फुगणे किंवा जुलाब असे त्रास होऊ शकतात.
advertisement
- जास्त प्रमाणात उसाचा रस प्यायल्यानं शरीरातील कॅल्शियम-फॉस्फरसचं संतुलन बिघडू शकतं. यामुळं हाडांवर परिणाम होण्याची शक्यता असते.
- काही लोकांना उसाचा रस प्यायल्यानंतर शरीरावर खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sugarcane Juice Facts : उसाच्या रसाच्या एका ग्लासमध्ये किती चमचे साखर असते? तज्ज्ञांनी सांगितलेला आकडा वाचून घाबराल!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement