advertisement

Ashok Kharat Case: अमावस्येच्या रात्री खरातच्या बंगल्याबाहेर महागड्या गाड्यांच्या रांगा! राजकीय बड्या नेत्यांचं गुपित 'त्या' ५ कोटींच्या महालात?

Last Updated:

Ashok Kharat : स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या भोंदू खरातचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. खरातच्या कार्यालयात नव्हे तर त्याने उभारलेल्या 'कोटींच्या महालात' ही रहस्य दडली असल्याची माहिती समोर आली आहे.

अमावस्येच्या रात्री खरातच्या बंगल्याबाहेर महागड्या गाड्यांच्या रांगा! राजकीय बड्या नेत्यांचं गुपित 'त्या' ५ कोटींच्या महालात?
अमावस्येच्या रात्री खरातच्या बंगल्याबाहेर महागड्या गाड्यांच्या रांगा! राजकीय बड्या नेत्यांचं गुपित 'त्या' ५ कोटींच्या महालात?
नाशिक: स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या भोंदू खरातचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक खरात प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून सुरू असून त्यांनी तपासाला वेग दिला आहे. अशोक खरातच्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. खरातच्या कार्यालयात नव्हे तर त्याने उभारलेल्या 'कोटींच्या महालात' ही रहस्य दडली असल्याची माहिती समोर आली आहे. अमावस्येच्या रात्री काही बड्या राजकीय नेत्यांनीदेखील चोरपावलांनी बंगल्यावर हजेरी लावली होती, अशी माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ज्या गल्लीत तीन-तीन माजी आमदारांचे वास्तव्य आहे, तिथेच साधारण २०१२ च्या सुमारास भोंदू 'कॅप्टन' अशोक खरातने ५ कोटींहून अधिक खर्च करून आपला 'तृप्तबाला' नावाचा महाल उभा केला. मात्र, हा बंगला केवळ त्याच्या भव्यतेसाठी नाही, तर तिथल्या भिंतींमागे दडलेल्या काळपट कृत्यांमुळे आता नाशिकमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर, या महालाच्या गर्भात दडलेली अनेक काळी रहस्ये आता उघड होऊ लागली आहेत.
advertisement

अमावास्येचा 'दरबार' आणि व्हीआयपी पाहुणे

'दिव्य मराठी'ने दिलेल्या वृत्तानुसार, खरातच्या या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे, असा खळबळजनक खुलासा स्थानिक नागरिकांनी केला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर नागरिकांनी सांगितले की, "अमावास्येच्या रात्री या बंगल्याबाहेर महागड्या आलिशान गाड्यांच्या रांगा लागायच्या." विशेष म्हणजे, राजकीय नेते, बडे अधिकारी आणि आपली ओळख लपवू पाहणारे अनेक 'व्हीआयपी' लोक खरातच्या अधिकृत कार्यालयात न जाता, चोरट्या पावलांनी या बंगल्याची पायरी चढायचे. रात्रीच्या काळोखात रंगणाऱ्या या छुप्या दरबारात नक्की काय चालायचे? याची आता संपूर्ण नाशिकमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
advertisement

सुरक्षेसाठी विदेशी श्वान...

खरातने आपल्या काळ्या कारनाम्यांभोवती केवळ सिमेंटची तटबंदीच उभारली नव्हती, तर सुरक्षेच्या नावाखाली दहशतीचे एक साम्राज्य निर्माण केले असल्याचे सांगण्यात येते. बंगल्याच्या आवारात लाखो रुपये किमतीचे दोन विदेशी जातीचे हिंस्र श्वान पाळण्यात आले होते. या कुत्र्यांच्या भीतीने परिसरातील नागरिक या बंगल्याच्या सावलीला उभे राहण्याचेही धाडस करत नसत. एक प्रकारे या श्वानांचा वापर करून खरातने आपल्या गुन्हेगारी कृत्यांभोवती दहशतीचे एक 'अदृश्य कुंपण' तयार केले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: अमावस्येच्या रात्री खरातच्या बंगल्याबाहेर महागड्या गाड्यांच्या रांगा! राजकीय बड्या नेत्यांचं गुपित 'त्या' ५ कोटींच्या महालात?
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement