advertisement

Weather Alert: धोका वाढला! 11 ते 4 घरीच थांबा, महाराष्ट्रावर पुन्हा संकट, 24 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज पुन्हा कमाल तापमानाचा पारा चाळीशी पार जाण्याची शक्यता आहे.
1/7
महाराष्ट्रात मार्चच्या शेवटच्या टप्प्यात उष्णता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात उष्णतेच्या लाटे सोबत अवकाळी संकट देखील घोंघावतं आहे. पण आता मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होईल. 27 मार्चला राज्याच्या बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील, तर कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान जाणवेल. <a href = 'https://news18marathi.com/tag/weather-forecast/'>आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ.
आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ. " width="1600" height="900" /> महाराष्ट्रात मार्चच्या शेवटच्या टप्प्यात उष्णता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात उष्णतेच्या लाटे सोबत अवकाळी संकट देखील घोंघावतं आहे. पण आता मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होईल. 27 मार्चला राज्याच्या बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील, तर कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान जाणवेल. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकणात आज कोरडे ते अंशत: ढगाळ हवामान राहील. उष्ण आणि दमट स्थिती असली तरी हवामानाचा कोणताही अलर्ट नाही. मुंबईसह ठाणे, रायगड परिसरात कमाल तापमान 34-36 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाची शक्यता नाही. परंतु, उकाडा हैराण करेल.

3/7
उत्तर महाराष्ट्रात आज देखील हवामान मुख्यत: कोरडे आणि निरभ्र राहील. तुरळक ठिकाणी अंशत: ढगाळ राहू शकते, पण पावसाची शक्यता नाही. नाशिकसह, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगरमध्ये कमाल तापमान 36-40 अंशांच्या दरम्यान राहील. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहील.

4/7
मध्य महाराष्ट्रावरील अवकाळी संकटाची तीव्रता कमी झाली आहे. आजपासून मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत हवापालट होईल. हवामान मुख्यतः कोरडे राहील. कमाल तापमान 35-38 अंश सेल्सिअस राहील. काही ठिकाणी तुरळक वादळ आणि गारपीट स्थिती असेल.

5/7
पुढील 3 दिवस मराठवाड्याच्या हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. कमाल तापमान 37-40 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत अवकाळी संकटाचा मोठा फटका बसला होता. परंतु, पुढील 3 दिवस अवकाळीचा धोका कमी राहील. पावसाचा कोणताही इशारा नाही.

6/7
महाराष्ट्रातून अवकाळीचा धोका कमी झाला आहे. मात्र विदर्भात संकट कायम आहे. आज नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तर तापमानाचा पारा चढणार असून कमाल तापमान 38-41 अंशांवर जाईल. अकोल्यात सर्वोच्च तापमानाची नोंद होईल.

7/7
दरम्यान, राज्यात येत्या दोन दिवसांत कमाल तापमानाचा पारा 2-4 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता इतर भागात अवकाळी संकटाचा धोका कमी झाला आहे. परंतु, वाढत्या तापमानामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर जाणे टाळावे लागेल. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement