advertisement

Suraj Chavan : 'मरी आई माता मला...' दैवी शक्तीबद्दल सूरज चव्हाणचा शॉकिंग खुलासा, पहिल्यांदाच सांगितलं यशाचं 'ते' सीक्रेट

Last Updated:
Suraj Chavan Interview: नुकतंच एका मुलाखतीत सूरजने आपल्या यशाचं गुपित उघड केलं असून आपल्याकडे एक दैवी शक्ती असल्याचा खळबळजनक खुलासाही त्याने केला आहे.
1/11
ज्याचं नाव घेतल्याशिवाय बिग बॉस मराठीचा विषय पुढे सरकूच शकत नाही, तो म्हणजे 'झापूक झुपूक' स्टार सुरज चव्हाण. सोशल मीडियावर आपल्या रील्समुळे सातत्याने चर्चेत राहणारा सूरज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

2/11
बिग बॉस मराठी ५ जिंकल्यानंतर सूरजचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. या शोमुळे हा सोशल मीडिया स्टार घराघरात पोहोचला. इतकंच नाही, तर त्याने आपली 'झापूक झुपूक' स्टाईल अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचवली. अशातच एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या सूरज चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

3/11
नुकतंच एका मुलाखतीत सूरजने आपल्या यशाचं गुपित उघड केलं असून आपल्याकडे एक दैवी शक्ती असल्याचा खळबळजनक खुलासाही त्याने केला आहे.
नुकतंच एका मुलाखतीत सूरजने आपल्या यशाचं गुपित उघड केलं असून आपल्याकडे एक दैवी शक्ती असल्याचा खळबळजनक खुलासाही त्याने केला आहे.
advertisement
4/11
सूरजची झापूक झुपूक स्टाईल आणि बुक्कीत टेंगूळ हा डायलॉग जितका फेमस झाला, तितकंच सतत त्याच्या तोंडून निघणारं 'मरी आई माता'चं नाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. याबद्दल बोलताना सूरजने सांगितलं,
सूरजची झापूक झुपूक स्टाईल आणि बुक्कीत टेंगूळ हा डायलॉग जितका फेमस झाला, तितकंच सतत त्याच्या तोंडून निघणारं 'मरी आई माता'चं नाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. याबद्दल बोलताना सूरजने सांगितलं, "आई मरी माता, भगवान शिव आणि गणपती बाप्पा यांच्या आशीर्वादानेच माझ्या दिवसाची सुरुवात होते. माझ्याकडे एक दैवी शक्ती आहे, जी मला मरी आई मातेकडून मिळते. तीच मला बुद्धी देते आणि मी जे काही बोलतो, ते अख्ख्या महाराष्ट्रात गाजतं."
advertisement
5/11
सूरजची मरी आईवर इतकी श्रद्धा आहे की, बिग बॉस जिंकल्यानंतर त्याने आपली ट्रॉफीही सर्वात आधी मरी आईच्या चरणी अर्पण केली होती.
सूरजची मरी आईवर इतकी श्रद्धा आहे की, बिग बॉस जिंकल्यानंतर त्याने आपली ट्रॉफीही सर्वात आधी मरी आईच्या चरणी अर्पण केली होती.
advertisement
6/11
आज सूरज हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सेलिब्रिटी बनला आहे. आज जरी तो महागड्या गाड्यांमधून फिरत असला, तरीही एक काळ असा होता, जेव्हा त्याला फाटके कपडे घालून दिवस काढावे लागले होते.
आज सूरज हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सेलिब्रिटी बनला आहे. आज जरी तो महागड्या गाड्यांमधून फिरत असला, तरीही एक काळ असा होता, जेव्हा त्याला फाटके कपडे घालून दिवस काढावे लागले होते.
advertisement
7/11
सूरज हा ५ बहिणींनंतरचा धाकटा भाऊ असल्याने आई-वडील त्याचे खूप लाड करायचे. मात्र, वडिलांच्या निधनानंतर परिस्थिती बदलली. त्याचे फाटके कपडे आणि घराची बिकट अवस्था पाहून लोक त्याला नाव ठेवायचे.

8/11
मात्र, भाच्याकडून व्हिडिओ बनवायला शिकल्यावर त्याने स्वतः कष्ट करून त्याचा पहिला मोबाईल विकत घेतला होता. त्याच्या व्हिडिओमधील 'एसक्यू आरक्यू झेडक्यू' आणि 'गोळीगत' हे डायलॉग्स तर गाजलेच, पण 'बुक्कीत टेंगुळ' ने इतिहास रचला.

9/11
सूरजने या डायलॉगमागची गंमत सांगितली. एकदा व्हिडिओ शूट करताना त्याच्या मित्राने विचारलं,
सूरजने या डायलॉगमागची गंमत सांगितली. एकदा व्हिडिओ शूट करताना त्याच्या मित्राने विचारलं, "सूरज भाऊ, आता नवीन काय?" आणि सहजच सूरजच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, "देऊ का एक बुक्कीत टेंगुळ?" आणि बघता बघता हा डायलॉग ट्रेंडिंगवर आला.
advertisement
10/11
२९ नोव्हेंबर २०२५ रोजी सूरजने त्याची बालपणीची मैत्रीण संजना गोफणे हिच्याशी बारामतीत धुमधडाक्यात लग्न केलं. मात्र, या लग्नाला 'बिग बॉस'मधील त्याचे जवळचे मित्र आले नाहीत.
२९ नोव्हेंबर २०२५ रोजी सूरजने त्याची बालपणीची मैत्रीण संजना गोफणे हिच्याशी बारामतीत धुमधडाक्यात लग्न केलं. मात्र, या लग्नाला 'बिग बॉस'मधील त्याचे जवळचे मित्र आले नाहीत.
advertisement
11/11
यावर सूरजने पहिल्यांदाच आपली खंत बोलून दाखवली,
यावर सूरजने पहिल्यांदाच आपली खंत बोलून दाखवली, "गरीबाचं पोरगं आहे म्हणून कदाचित कोणी आलं नसेल. पण मला त्याचं वाईट वाटत नाही. माझे फॅन्स हेच माझे देव आहेत आणि अख्खा महाराष्ट्र माझ्या लग्नाला आला होता, हेच माझ्यासाठी खूप आहे!"
advertisement
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement