advertisement

50 तासांच्या ड्यूटीनंतर सुन घरी आली, पण आरती हातात घेतलेल्या सासूच्या त्या एका वाक्याने नेटकरी भडकले, पाहा Video

Last Updated:

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी घर आणि करिअर ही तारेवरची कसरत करण्यासारखं असतं. सण असो वा उत्सव, रुग्णांचा जीव वाचवणं हीच त्यांची पहिली प्राथमिकता असते. त्यामुळे अशावेळी त्यांना सणांला घरी येण्याचा किंवा सुट्टी घेण्यासाठी काही एक्सक्यूज नसतात.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : आजच्या काळात करिअर आणि घर यांची सांगड घालणं हे एक मोठं आव्हान बनलं आहे. अशा वेळी जेव्हा एखादी महिला करिअरसाठी खूप फोक्स असते आणि ती कामासाठी दोन-चार दिवस घरीच दिवसांनंतर घरी परतते, तेव्हा तिचं स्वागत कसं व्हायला हवं? फुलांच्या वर्षावाने की टोमण्यांच्या वर्षावाने? सोसायटीमधील आजूबाजूची काही उदाहरणांवरुन तुम्ही म्हणाल की टोमण्यांनीच स्वागत झालं असेल आणखी काय.... यात आज आम्ही तुम्हाला अशा सासू-सुनेचा व्हिडीओ दाखवणार आहोत, जो सोसायटीच्या दृष्टीने बरोबर आणि चुक दोन्ही आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांमध्ये दोन वेगवेगळे गट पडले आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी घर आणि करिअर ही तारेवरची कसरत करण्यासारखं असतं. सण असो वा उत्सव, रुग्णांचा जीव वाचवणं हीच त्यांची पहिली प्राथमिकता असते. त्यामुळे अशावेळी त्यांना सणांला घरी येण्याचा किंवा सुट्टी घेण्यासाठी काही एक्सक्यूज नसतात. असंच एका महिलेसोबत घडलं, ती जेव्हा आपल्या घरी काम करुन दोन-तीन दिवसांनी घरी आली, तेव्हा तिच्या सासूने ज्यापद्धतीने तिचं स्वगत केलं ते धक्कादायकच आहे. कारण असं वागणं एखाद्या सासूकडून क्वचितच कधी पाहायला मिळतं.
advertisement
सध्या सोशल मीडियावर एका महिला प्लास्टिक सर्जनचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यावरून नेटकरऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. एकीकडे सासू-सुनेचं प्रेम पाहून लोक सुखावले आहेत, तर दुसरीकडे सासूने मारलेल्या एका टोमण्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
इंस्टाग्रामवर @kansal2708 या हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये डॉ. सौम्या गुप्ता या 50 तासांच्या थकवून टाकणाऱ्या ड्युटीनंतर घरी परतताना दिसत आहेत. सौम्या या प्लास्टिक सर्जन आहेत. त्या घरी पोहोचताच त्यांच्या सासूबाईंनी दारात उभं राहून त्यांची आरती केली आणि 'आमचे मोठे भाग्य, की तुम्ही आमच्या घरी आलात,' असं म्हणत तिचं स्वागत केलं. हे दृश्य पाहून कोणाचंही मन भरून येईल. सौम्या यांनीही सासूच्या पाया पडत आशीर्वाद घेतले आणि म्हणाल्या, "मम्मी थँक्यू, देवाने मला घरात जास्त वेळ घालवण्याची सद्बुद्धी द्यावी."
advertisement
सासूचा 'तो' टोमणा आणि वादाला तोंड
व्हिडिओमध्ये सगळं काही गोड वाटत असतानाच सासूबाईंनी मागून डब्बा घेऊन येणाऱ्या काही लोकांना असं काही म्हणतात, ज्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या. त्या म्हणाल्या, "भाईसहाब, अशी सून पाहिलीत का? जी 4-4 दिवसांनी घरी येते. आम्हाला काय सुख आहे हिचं?" हे ऐकल्यावर सौम्या फक्त हसल्या आणि आत निघून गेल्या. पण सोशल मीडियावर मात्र या एका वाक्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Poonam Kansal (@kansal2708)



advertisement
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
या व्हिडिओला आतापर्यंत 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. काही लोक म्हणतायत की "किती गोड कुटुंब आहे, सासूबाई गंमतीत बोलल्या असतील. शेवटी त्यांनी स्वागत तर दणक्यात केलं." तर इतर लोकांचं असं म्हणणं आहे की,, "एवढ्या मोठ्या सर्जनला सुद्धा असे टोमणे ऐकावे लागतात, हे दुर्दैवी आहे. सून काय सासूच्या सुखासाठी घरी आली आहे का?" तर दुसऱ्याने लिहिलं, "50 तास हॉस्पिटलमध्ये राबून आल्यावर सासूने 'आराम कर' म्हणण्याऐवजी 'हिचं काय सुख' असं म्हणणं असंवेदनशील आहे." काही युजर्सनी तर डॉ. सौम्या यांच्या फ्रेश लूकचंही कौतुक केलं, तर काहींनी 'वर्क-लाईफ बॅलन्स'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
advertisement
करिअर की कुटुंब?
हा व्हिडिओ केवळ एक कौटुंबिक क्षण नसून, तो आजच्या काळातील एका मोठ्या वास्तवावर भाष्य करतो. उच्चशिक्षित आणि जबाबदार पदावर असलेल्या महिलांना आजही घराकडून वेळेची अपेक्षा केली जाते, जी अनेकदा पूर्ण करणं अशक्य असतं. सासूचं ते बोलणं कौतुक होतं की टोमणा, हे त्या कुटुंबाचा भाग आहे, पण त्याने समाजात एका नव्या चर्चेला नक्कीच वाचा फोडली आहे. काही लोक असं म्हणतायत की हा मुद्दाम तयार केला गेलेला व्हिडीओ आहे, जो लोकांच्या मनोरंजनासाठी आहे. तर काही लोक याला वास्तव मानत आहे. न्यूज 18 ने व्हिडीओची सत्यता तपासलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
50 तासांच्या ड्यूटीनंतर सुन घरी आली, पण आरती हातात घेतलेल्या सासूच्या त्या एका वाक्याने नेटकरी भडकले, पाहा Video
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement