advertisement

Deccan Queen Express: उद्याचा दिवस खास! सुटणार 'नवी' डेक्कन क्वीन; प्रवाशांसाठी रेल्वेचा विशेष 'सरप्राईज', पाहा काय बदलले?

Last Updated:

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने गुरुवारी मुंबई सीएसएमटी स्थानकावर डेक्कन क्वीन एक्सप्रेसच्या एका खास कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई: मध्य रेल्वेवरील डेक्कन क्वीन एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे डेक्कन क्वीन एक्सप्रेसच्या 'ट्रेन महोत्सव' ची घोषणा करण्यात आली आहे. या एक्सप्रेसच्या खास कार्यक्रमाचे आयोजन उद्या अर्थात 27 मार्च रोजी शुक्रवारी करण्यात आलेले आहे.
मुंबई सीएसएमटी (Mumbai CSMT) स्थानकावरून सायंकाळी 05:10 वाजता ही एक्सप्रेस सुटते. ही एक्सप्रेस सुटण्याच्या एक तास आधीच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या एक्सप्रेसची यावेळी खास सजावट करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, भारतातील पहिली सुपरफास्ट आणि विजेवर चालणारी एक्सप्रेस 'डेक्कन क्वीन'चा 1930 पासूनचा ट्रेनचा समृद्ध इतिहास प्रवाशांना दाखवण्यात येणार आहे.
advertisement
'ट्रेन महोत्सवा'च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना अधिकच आरामदायी प्रवास करण्यासाठी आणि या एक्सप्रेसचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी डेक्कन क्वीनचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेनमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. प्रवाशांना उत्कृष्ट जेवणाचा अनुभव देण्यासाठी, डिझायनिंग डायनिंग कार, न्यू फर्निश केलेले फर्निचर, छत आणि फरशीसह नूतनीकरण करण्यात आले आहे.
advertisement
उत्तम स्वच्छतेसाठी विनाइल, ड्युरो वाइप मॅट्स, साबण आणि टिश्यू डिस्पेंसरने सुसज्ज स्वच्छतागृहे, एसी कोचमधील सीट्सला नवीन सीट कव्हर्स लावून त्याचं रूप बदलण्यात आलं आलं आहे. ट्रेनचे वॉल आणि रूफची आकर्षक थीम करण्यात आली आहे. प्रवाशांना ट्रेनमध्ये आल्यानंतर नेहमीच सुगंध यायला हवा, यासाठी सुगंधित एअर फ्रॅग्रन्स डिस्पेंसर बसवणार आहे.
डेक्कन क्वीन ही भारतातील पहिली डिलक्स एक्सप्रेस आहे. या एक्सप्रेसची सुरूवात 1 जून 1930 पासून झाली असून मुंबई ते पुणे या मार्गावर दररोज धावते. भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन, पहिली लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक इंजिन असलेली प्रवासी ट्रेन यांसह अनेक गोष्टींमध्ये या एक्सप्रेसने बाजी मारली आहे. पुण्याहून मुंबईमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक नोकरदारांसाठी ही एक्सप्रेस फार महत्त्वाची ठरते.
advertisement
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणेदरम्यान 1 जून 1930 पासून ही एक्सप्रेस धावू लागली. या एक्सप्रेसच्या वक्तशीरपणामुळे मुंबई आणि पुण्यातील प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. गेल्या 96 वर्षांमध्ये इतिहासात ही रेल्वेगाडी दोन शहरांमधील प्रवाशांसाठी महत्त्वाचा दुवा बनली आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देणारी ही पहिली डिलक्स ट्रेन होती. त्यामुळे तिला 'डेक्कन क्वीन' असे नाव देण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Deccan Queen Express: उद्याचा दिवस खास! सुटणार 'नवी' डेक्कन क्वीन; प्रवाशांसाठी रेल्वेचा विशेष 'सरप्राईज', पाहा काय बदलले?
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement