खरातचे Video व्हायरल होताच केसरकरांचा कानाला खडा, म्हणाले, इथून पुढे मी त्या मंदिरात...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने माजी मंत्री दीपक केसरकर यांनी घेतल साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला.
हरीश दिमोटे, प्रतिनिधी, अहिल्यानगर (शिर्डी) : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आणि महिलांच्या लैंगिक शोषणाच्या व्हिडीओनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, खरातमुळे अनेक बडे राजकीय नेते अडचणीत आले आहेत. माजी मंत्री दीपक केसरकर यांचेही अशोक खरात याच्याकडे नेहमी जाणे-येणे असायचे. खरात याची दुष्कृत्य समोर आल्यानंतर केसरकरांवर मोठी टीका झाली. मात्र आता केसरकरांना सद्बुद्धी सुचली असून त्यांनी कानाला खडा लावला आहे.
श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने माजी मंत्री दीपक केसरकर यांनी घेतल साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. भोंदू खरातबद्दल विचारले असता, त्याच्या दुष्कृत्याबाबत माहित नव्हते. मी धार्मिक असल्याने त्या मंदिरात गेलो. खरात मंदिराच्या आडून केलेल कृत्य निंदनीय असल्याचे सांगत इथून पुढे मी त्या मंदिरात कधीही जाणार नाही, असे दीपक केसरकर म्हणाले.
advertisement
माझ्या विरोधता राजकीय षडयंत्र, राऊत सूड उगवत आहेत
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मी मंत्री असताना त्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. त्यांनाही या भोंदूची कल्पना नव्हती. खरातने ज्योतिष शास्त्र बदनाम केले, असे केसरकर म्हणाले. माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र रचले जात आहे.संजय राऊत काहीही बोलतात. त्यांना देखील परिवार आहे. संजय राऊत ठाकरेंचे प्रवक्ते आणि मधील काळात मी शिवसेना शिंदे गटाचा प्रवक्ता होतो. त्याचा कदाचित ते सूड उगवतायत आणि विधाने करतायत. भोंदू खरातमुळे अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिमा मलिन होतायत. 39 नेत्यांचे खरात बरोबर फोटो आहेत पण संजय राऊत मलाच टारगेट करतायत, असे दीपक केसरकर म्हणाले.
advertisement
ईशान्येश्वर मंदिरात मी आता कधीही जाणार नाही
ईशान्येश्वर मंदिरात मी आता कधीही जाणार नाही, तेथील विश्वस्तांची SIT कडून चौकशी होतेय. भोंदू खरातला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी आणि पीडितांना न्याय मिळायला हवा, असे केसरकर म्हणाले.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 10:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खरातचे Video व्हायरल होताच केसरकरांचा कानाला खडा, म्हणाले, इथून पुढे मी त्या मंदिरात...










