advertisement

प्लास्टिकचा नाग आणला, नागदेवता प्रसन्न झाल्याचा बनाव, खरातने उद्योगपतीला कसं लुटलं? खतरनाक स्टोरी

Last Updated:

अशोक खरात यानं उद्योगपती जासूद यांना आपल्या जाळ्यात कसं ओढलं आणि त्यांची फसवणूक केली याचा उलगडा झाला आहे.

अशोक खरात
अशोक खरात
नाशिक : महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याची मालिका काही संपण्याचं नाव घेत नाहीयेत. त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यात त्यानं एकाला कोट्यवधीचा गंडा घातलाय. लोकांच्या आस्थेचा, श्रद्धेचा त्याने विश्वासघात केलाय.
जगाच्या पाठीवर 21 देशांत फिरून परिस शक्ती प्राप्त करून देण्याची बतावनी भोदू खरातनं केली होती. एवढचं काय पण नाग दंशानं मृत्यूची भीती दाखवून खरातनं राजेंद्र जासूद या व्यावसायिकाला एक दोन नव्हे तर तब्बल 4 ते 5 कोटींचा गंडा घातला होता. या फसवणुकीची तक्रार आता जासूद यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात दाखल केलीय. खरातनं जासूद यांना कसं आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांची फसवणूक केली याचा उलगडा झाला आहे.
advertisement

भोंदू खरातचा फंडा, लुटीचा धंदा

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना लॉजिस्टिक व्यवसायात यश मिळवून देण्याचं आमिष दाखवून खरातनं जाळ्यात ओढलं. अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल, अशी भीती घालत सुरुवातीला खरातनं 90 लाखांची मर्सिडीज कार जबरदस्तीनं स्वतःच्या नावावर करून घेतली. धक्कादायक म्हणजे, 1 ऑक्टोबर 2018 रोजी मिरगाव येथील मंदिरात पूजेदरम्यान प्लास्टिकच्या बनावट नागाचा वापर करून ईशान्येश्वर महाराज आले असं सांगत नागदेवता प्रसन्न झाल्याचा बनाव त्यानं रचला होता.
advertisement

21 देशात जाऊन तिथल्या मातीला स्पर्श केल्यानंतरच परिस शक्ती येईल

नागदेवतेनं दर्शन दिलं आता पुढील 5 वर्षात 21 देशात जाऊन तिथल्या मातीला स्पर्श केल्यानंतरच परिस शक्ती प्राप्त होईल असं आमिष खरात यानं जासूद यांना दाखवलं. आणि अवतारपुजेसाठी म्यानमार, ग्रीनलँड, अमेरिका, युगांडा, इजिप्त आणि बांगलादेश यांसह अनेक देशांचा प्रवास त्यानं जासूदच्या खर्चानं केला. डिसेंबर 2018 साली म्यानमार आणि त्यानंतर जुन-जुलै 2019 साली ग्रीनलैंड देशात या भोंदूनं परदेशवारी केली. त्यानंतर अमेरिकेत घेऊन जाण्याचा आग्रह धरला. अमेरिकेतील एका रुग्णालयात जासूद यांनी 4 वेळा खरातवर महागडे उपचार केले. त्यासाठी एकूण 29 लाख 81 हजार रुपये इतका खर्च बळजबरीनं करण्यास भाग पाडण्यात आलं होतं.
advertisement

अवतारपुजेच्या नावाखाली परदेश प्रवास

ग्रीनलँडच्या हॉटेलमध्ये असताना कैलास मानसरोवरला स्वर्गाचं पहिलं टोक आणि ग्रीनलँडला स्वर्गाचं दुसरं टोक मानतात असं सांगून खरातनं फरशीवर झोपून स्वर्गात गेल्याचं नाटक केलं. आणि त्याचवेळी आपली फसवणूक होत असल्याचं जासूद यांच्या लक्षात आलं होतं. परदेश प्रवास तर झाला पण खरातची भूक संपत नव्हती. अवतारपुजेच्या नावाखाली परदेश प्रवास आणि अमेरिकेतील वैद्यकिय उपचार करुन घेतल्यानंतर खरातनं जासूदला उत्तरपूजा करण्यास सांगितलं. आणि त्यासाठी नवी वास्तू पाहिजे असं म्हणत मिरगावातील फार्म हाऊसच्या बांधकामासाठी तब्बल 1 कोटी 11 लाख रुपये उकळले.
advertisement

फार्म हाऊसच्या बांधकामासाठी 1 कोटी 11 लाख उकळले

मिरगाव येथील फार्म हाऊसच्या बांधकामासाठी खरातनं जासूदकडून 1 कोटी 11 लाख रुपये वसूल केले. नवीन वास्तूमध्ये तुर्कस्थानमधून तब्बल 90 लाखांचं फर्निचर विकत घेण्यात आलं. त्यानंतर सागवानी लाकडामध्ये फर्निचर बनवून देण्यासाठी पुण्याच्या टिंबर मार्केटमधून 29 लाखांचं सागवानी लाकूड जबरदस्तीनं खरेदी करण्यास भाग पाडल्यानं तक्रारीत म्हटलंय. हे सर्व व्यवहार जासूद यांनी आरटीजीएस आणि ऑनलाइन माध्यमातून केल्याचं एफआयआरमधून समोर आलंय.
advertisement

आम्ही जासूद यांना गाठलं पण ते म्हणाले- प्रकरण हायकोर्टात

खरातकडून लुटलं गेल्याचं लक्षात आल्यानंतर जासूद यांनी त्याच्यावर खर्च केलेल्या पैशांची मागणी केली होती. मात्र त्यावेळी खरातनं जासूद यांच्यावरच वावी पोलीस ठाण्यात 5 कोटींच्या खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप जासूद यांनी केलाय. या सगळ्या प्रकरणावर जासूद यांना गाठून न्यूज 18 मराठीनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रकरण कोर्टात असल्यानं जासूद यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
advertisement
सध्या SIT आणि नाशिक पोलिसांकडून भोंदू खरातची कसून चौकशी केली जातेय. शिवाय 5 कोटींच्या खंडणी प्रकरणाचाही समांतर तपास एसआयटीनं सुरू केलाय. भोंदू अशोक खरातचे दररोज समोर येणारे कारनामे धक्कादायक आहेत. आगामी काळात आणखीही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्लास्टिकचा नाग आणला, नागदेवता प्रसन्न झाल्याचा बनाव, खरातने उद्योगपतीला कसं लुटलं? खतरनाक स्टोरी
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement