Petrol-Diesel Price : आज 'या' शहरांमध्ये वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव! घराबाहेर पडण्यापूर्वी घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्या पेट्रोल-डिझेल चर्चेत आहे. कारण जागतिक युद्धाचा परिणाम इंधनाच्या पुरवठ्यावर होणार अशा चर्चा सुरू आहे. दरम्यान आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही वाढल्या आहेत.
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल हे आपल्या रोजच्या वापरातील महत्त्वाचा घटक आहे. कारण दळणवळणासाठी याची आपल्याला रोजच गरज पडते. याच्या किंमतीचा सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होतो. सध्या क्रूडच्या किंमती सातत्याने कमी जास्त होताय. दरम्यान एक दिवसपूर्वी क्रूड 97 डॉलरच्या आसपास होता. तो आज 103 डॉलरवर आहे. म्हणजे किंमतीत वाढ झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं, मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमती या 104.21 रुपये प्रति लिटर आहेत. डिझेल 92.15 रुपये प्रति लिटरवर विकलं जातंय. पुण्यात पेट्रोलचा भाव 104.04 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 90.57 रुपये प्रति लिटरवर विकलं जातंय. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 95.50 रुपये प्रति लिटर आहेत. तर डिझेल हे 89.50 रुपये प्रति लिटर विकलं जातंय. या शहरांमध्ये इंधनाच्या किंमतीत जास्त वाढ झालेली नाही.
advertisement
advertisement
गेल्या दोन वर्षांपासून किंमती स्थिर का? : मे 2022 नंतरपासून केंद्र आणि अनेक राज्यद्वारे टॅक्समध्ये कपात करण्यात आली. ज्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये स्थिरता पाहायला मिळतेय. खरंतर आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार होत राहतो. तरीही भारतीय उपभोक्सांसाठी किंमती तुलनात्मकरित्या स्थिर राहिल्या आहेत.








