advertisement

Share Market: ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी कामाची बातमी, 26 मार्च रोजी शेअर मार्केट सुरू राहणार की बंद?

Last Updated:
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुट्ट्या जास्त असल्याने शेअर मार्केटवर त्याचा परिणाम होणार आहे. आधीच इराण युद्धामुळे मार्केट निगेटिव्ह असताना आता सलग सुट्ट्यांमुळे गुंतवणूकदारांची गोची झाली आहे.
1/6
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा शेअर बाजारातील उलाढालीसाठी महत्त्वाचा असतो, इयर एन्डिंग आणि क्लोजिंगमुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शेअर मार्केटचा कल महत्त्वाचा ठरतो. मात्र यंदा सुट्ट्यांच्या गणितामुळे गुंतवणूकदारांची गोची होणार आहे. २६ मार्च रोजी बाजार बंद राहणार असून, त्यानंतर येणाऱ्या वीकेंडमुळे ट्रेडिंगसाठी खूपच मर्यादित संधी उपलब्ध असणार आहेत.

2/6
२६ मार्च रोजी देशभरात राम नवमीचा सण साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने भारतीय शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. २७ मार्चला बाजार पुन्हा उघडेल खरा, पण त्यानंतर २८ आणि २९ मार्चला शनिवार-रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने सलग दोन दिवस बाजार बंद राहील.

3/6
या आठवड्यात गुंतवणूकदारांना आपले पोझिशन्स क्लिअर करण्यासाठी फारच कमी वेळ मिळणार आहे. मार्च महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना सुट्ट्यांचे सत्र संपलेले नाही. ३० मार्चला बाजार सुरू होईल, पण लगेच ३१ मार्च रोजी महावीर जयंतीनिमित्त पुन्हा सुट्टी असणार आहे.

4/6
 २६ मार्च ते ३१ मार्च या सहा दिवसांच्या कालावधीत तब्बल चार दिवस बाजार बंद राहणार आहे. आर्थिक वर्ष संपत असताना होणारी ही सुट्ट्यांची साखळी व्यापाऱ्यांच्या नियोजनावर परिणाम करू शकते.

5/6
केवळ मार्चच नाही, तर एप्रिल आणि मे महिन्यातही सुट्ट्यांचा सिलसिला सुरूच राहणार आहे. ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त बाजार बंद असेल, तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाणार आहे. याशिवाय १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी असेल. पुढे २८ मे (बकरी ईद) आणि २६ जून (मोहर्रम) रोजीही शेअर बाजारात कामकाज होणार नाही.

6/6
व्यवहाराचे दिवस कमी असल्याने बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळू शकते. अशा काळात गुंतवणूकदारांनी घाईघाईत निर्णय न घेता, आपल्या पोर्टफोलिओचे योग्य नियोजन करावे, असा सल्ला बाजार तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement