Shocking : पत्नी UPSC ची तयारी करत होती, पती रेल्वेत मोठा अधिकारी; घटस्फोटाच्या वादातून पतीने घेतला भयंकर सूड
Last Updated:
Malad Shocking Crime : मालाडमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथं घटस्फोट घेण्यावरुन महिलेसोबत धक्कादायक कांड झालेलं आहे.
मुंबई : पती-पत्नीमधील असलेल्या वादातून अनेक घटस्फोट होत असतात. यासाठी अर्ज करताना यांच्या अनेक बाचाबाची होणं सामान्य आहे. पण मुंबईत एका व्यक्तीने घटस्फोटासाठी पत्नीन अर्ज केल्यामुळे पत्तीची बदनामी होण्यासाठी अत्यंत धक्कादायक कृत्य केलेलं आहे.
घटस्फोटाच्या अर्जाचा असाही शेवट
मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत महिला (वय31)मूळती राजस्थानची असून सध्या ती मालाड पूर्व येथे वास्तव्यास असून युपीएससी परिक्षेची तयारी करत आहे तर तिचा पती पश्चिम रेल्वेत वरिष्ठ विभाग अभियंता आहे. या दोघांचे लग्न 25 नोव्हेंबर 2020 रोदी झाले होते. मात्र पत्तीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याने पतीने थेट तिचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत. सध्या या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.
advertisement
दोघांमधील वादाचे कारण काय?
तक्रारीनुसार, लग्नानंतरच्या काही दिवसांत पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे महिलेला समजले. त्यामुळे त्यांच्या वारंवार वाद होत असतं. या सर्व गोष्टींमुळे महिला 23 ऑगस्ट 2024 रोजी माहेरी राहायला गेली. त्यानंतरही आरोपी पती तिच्या माहेरी जाऊन शिवीगाळ करत आत्महत्येची धमकी देत होता. एवढंच नाही तर तिच्यासह घरच्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचीही धमकी देत असत.
advertisement
अकाउंट हॅक करून केला संतापजनक प्रकार
पतीच्या सातत्याने सुरु असलेल्या या प्रकारामुळे महिलेने वेगळे राहणे निवडले. दरम्यानच आरोपीने महिलेचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करुन तिच्या प्रोफाइलमध्ये बदल केला. त्यानंतर त्याने तिच्याच नावाने तिच्या मित्रांशी संवादही साधला आणि याला विरोध केल्यावर त्याने तिला बदनाम करण्याचीही धमकी दिली.
घटस्फोट अर्जानंतर वाढला त्रास
जून 2025 महिलेने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला त्यामुळे पती अधिक आक्रमक झाला. त्यामुळे त्याने 15 जानेवारील 2026 रोजी पुन्हा तिच्या अकाउंटवर जाऊन आक्षेपार्ह फोटो आणि पोस्ट अपलोड केल्या. एवढ्यावर तो थांबला नाही तर फोनकरुन तिला तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची-ठार मारण्याची धमकी दिल्या. काही महिन्यानंतर आरोपीने वन-टाईम-व्ह्यू स्वरुपाती तिचे खाजगी फोटो पोस्ट करुन परत हटवले.पण आरोपीने केलेला हा प्रकार तिने दुसऱ्या मोबाईलवरुन पाहिला.
advertisement
अखेर पोलिसांकडून गुन्हा दाखल
यातील पतीला त्रास दिल्यानंतर त्याने तिच्या मैत्रिणीला आणि मैत्रिणीच्या पतीलाही अपमानास्पद व्हॉइस मेजेस पाठवले. या तक्रारीच्या आधारे पोलिसांना त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 10:24 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : पत्नी UPSC ची तयारी करत होती, पती रेल्वेत मोठा अधिकारी; घटस्फोटाच्या वादातून पतीने घेतला भयंकर सूड








