advertisement

अमेरिका-इराण युद्धात पाकिस्तानची एन्ट्री, इस्लामाबादमध्ये मोठी घडामोड

Last Updated:

अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे LPG तुटवडा, व्यापार ठप्प. डोनाल्ड ट्रम्प शांततेचे संकेत, पाकिस्तान मध्यस्थी, 9 एप्रिलच्या गुप्त बैठकीकडे लक्ष.

इराण युद्धात आता पाकिस्तानची उडी, फोटो सौजन्य - AI
इराण युद्धात आता पाकिस्तानची उडी, फोटो सौजन्य - AI
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे आता ते देशच नाही तर जगभरात फटका बसायला लागला आहे, परिस्थिती हळूहळू गंभीर होत चालली आहे. छोटे उद्योगधंदे बंद होत आहेत, तर अनेक मोठे व्यवसायही LPG इंधनाच्या तुटवड्यामुळे ठप्प झाले आहेत. हार्मुजची सामुद्रधुनी बंद असल्याने व्यापाराला देखील मोठा फटका बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हं आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला अल्टीमेटम संपण्यापूर्वीच शांततेचे संकेत दिले आहेत. इराणने शांत राहाणं गरजेचं आहे," असं म्हणत ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले ५ दिवसांसाठी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या युद्धात आता पाकिस्तानने उडी घेतली आहे. पाकिस्तानचे सीडीएफ फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून सविस्तर चर्चा झाली. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, 9 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक होऊ शकते.
advertisement
या बैठकीसाठी अमेरिकेकडून उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस स्वतः पाकिस्तानात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुर्किए, इजिप्त आणि पाकिस्तान या मुस्लीम देशांनी या वादात मध्यस्थी केल्याचं समजतंय. चर्चेच्या बातम्यांदरम्यान ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोज्तबा खामेनेई सध्या बेपत्ता असून, इराणचं नेतृत्व जवळपास संपल्यात जमा आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.
advertisement
"आम्ही इराणमध्ये जे जे उद्ध्वस्त करण्यासारखं होतं, ते सगळं संपवलं आहे. आता त्यांना कळून चुकलंय की सामंजस्य करार करणंच त्यांच्या हिताचं आहे," अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असताना भारतानेही यात लक्ष घातलं आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनावर, सुरक्षेवर होणाऱ्या परिणामांबाबत भारताने आपली चिंता व्यक्त केली.
advertisement
जर ९ एप्रिलपर्यंत हा करार यशस्वी झाला, तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होऊन सामान्यांना दिलासा मिळू शकतो. जर युद्ध थांबवण्याबाबत कोणताही करार झाला नाही तर मात्र पुन्हा संपूर्ण जगात लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकीकडे चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने ट्रम्प यांचा उल्लेख धोकेबाज असा केलाय. आता या सगळ्यात पाकिस्तान मघ्यस्ती करणार म्हटल्यावर आता 9 एप्रिलकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या दिवशी युद्ध थांबणार की पुढे असं सुरू राहणार हे या बैठकीत ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
अमेरिका-इराण युद्धात पाकिस्तानची एन्ट्री, इस्लामाबादमध्ये मोठी घडामोड
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement