advertisement

Pickle Recipe : ट्राय करा पारंपरिक पद्धतीचं भरलेल्या मिरचीचं लोणचं, वाढवेल जेवणाची चव! पाहा सोपी रेसिपी

Last Updated:
Green Chili Pickle : जेवणासोबत आपल्याला कोणतं ना कोणतं लोणचं हवं असतं. आपल्या घरी नेहमीच लोणचं बनलेलं असतं. पण बहुतेकवेळा आपण कैरीचं लोणचं बनवतो. मात्र तुम्ही खास पारंपरिक पद्धतीचं हे मिरचीचं लोणचं नक्की बनवून पाहा.
1/7
घरात साधं जेवणही बनलेलं असेल तरी लोणच्यामुळे त्या जेवणाला आणखी रंगत येते. यातही जर तिखट आणि चटपटीत भरलेल्या मिरचीचं लोणचं असेल तर जेवण आणखी खास बनतं. विशेष म्हणजे हे लोणचं तुम्ही तुम्ही घरी खूप सोप्या पद्धतीनं बनवू शकता.

2/7
छतरपूरच्या गृहिणी राजकुमारी यांनी लोकल 18 ला ही लोणच्याची रेसिपी सांगितली आहे. हे लोणचं बनवण्यासाठी तुम्हाला हिरव्या मिरच्या, मोहरी, बडीशेप, जिरे, हिंग, मेथी, मीठ, हळद, मोहरीचे तेल, व्हिनेगर आणि लाल मिरची पूड लागेल.

3/7
लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी मिरच्या धुवून पूर्णपणे कोरड्या करा. तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर त्या मिरच्या 2 ते 3 तास ​​उन्हात नक्की वाळवा. भरलेल्या मिरचीचं लोणचं दोन प्रकारे बनवता येतं. एकत्र मिरची मधोमध कापून किंवा न कापताही लोणचं बनवता येतं.

4/7
लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी मिरचीचा वरचा भाग कापून सर्व बिया बाहेर काढा. तुम्ही बिया न काढताही लोणचं बनवू शकता. सर्वात आधी मसाल्याच्या मिश्रणात असलेले सर्व मसाले चांगले भाजून घ्या. नंतर हळद, मीठ, मिरची पूड, आमचूर पूड इत्यादी घालून चांगले मिसळा.

5/7
एका कढईत बडीशेप, मेथीचे दाणे आणि मोहरी हलके भाजून घ्या. थंड झाल्यावर ते जाडसर वाटून घ्या. आता लोणच्याच्या प्रमाणानुसार मोहरीचे तेल आणि एक चमचा व्हिनेगर घाला. आता तुमचा लोणच्याचा मसाला तयार आहे. आता मिरचीमध्ये हा मसाला भरण्याची वेळ आली आहे.

6/7
त्यांनी पुढे सांगितलं की, तुम्ही मिरच्या मधोमध कापल्या असतील, तर आतील रिकाम्या जागेत लोणचं भरा. मिरच्या न कापता लोणचं बनवायचं असेल, तर मिरचीच्या वरचं टोक कापून त्यात मसाला भरा. मसाला मिरच्यांच्या आकारानुसारच भरा. कारण मसाला जास्त भरल्यास वाळताना त्या फुटू शकतात. मसाला भरल्यानंतर बरण्या 4 ते 5 दिवसांसाठी बंद करून ठेवा.

7/7
शेवटी मोहरीचं तेल गरम करा आणि ते थोडं थंड होऊ द्या. हे लोणचं काचेच्या किंवा सिरॅमिकच्या बरणीत भरून ठेवा. यामुळे लोणचं खराब होणार नाही आणि वर्षभर सुरक्षित राहील. बरणीत पुरेसे तेल भरा. जेणेकरून मिरच्या तेलात पूर्णपणे बुडतील. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement