IPL 2026 : इशानला कर्णधार केलं, पण... कमिन्स पहिल्या मॅचआधीच येणार, कॅप्टन्सीवरून SRH मध्ये नवा ट्विस्ट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्याआधीच सनरायझर्स हैदराबादच्या टीममध्ये नवा ट्विस्ट आला आहे. हैदराबादने इशान किशनला कर्णधार केलं, पण पॅट कमिन्सही पहिल्या सामन्याआधी टीममध्ये येणार आहे.
हैदराबाद : आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्याआधीच सनरायझर्स हैदराबादच्या टीममध्ये नवा ट्विस्ट आला आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार टीमचा कर्णधार पॅट कमिन्स हा आयपीएलच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधीच, 24 मार्चला बंगळुरूमध्ये दाखल होणार आहे. पॅट कमिन्स हा फिटनेसच्या समस्यांमुळे सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असं सनरायझर्स हैदराबादने आधीच स्पष्ट केलं होतं.
कमिन्स सुरूवातीचे काही सामने खेळू शकणार नसल्यामुळे सनरायझर्स हैदराबादने इशान किशनला कर्णधार केलं. कमिन्स फिट होईपर्यंत इशान किशन टीमचं नेतृत्व करणार होता, पण आता कमिन्स आरसीबीविरुद्धच्या सामन्याच्या 4 दिवस आधीच टीममध्ये दाखल झाला आहे. आयपीएल 2026 चा पहिलाच सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
कमिन्स आला, मग कर्णधार कोण?
advertisement
सनरायझर्स हैदराबादचा काळजीवाहू कर्णधार इशान किशन हा 25 मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या आयपीएल कर्णधारांच्या बैठकीमध्ये हैदराबादच्या टीमचं प्रतिनिधित्व करणार आहे. या बैठकीमध्ये सर्व 10 टीमचे कर्णधार असतील, तसंच दुपारी 12 वाजता फोटो सेशन होईल, त्यानंतर संध्याकाळी 4.30 ते 6 या वेळेत बीसीसीआय अधिकारी आणि ब्रॉडकास्टर्स यांच्यात संवाद साधला जाईल.
ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्सचा सस्पेन्स
advertisement
कमिन्स आणि त्याचे ऑस्ट्रेलियन टीममधील फास्ट बॉलिंग सहकारी मिचेल स्टार्क आणि जॉश हेजलवूड हे तिघेही आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या तिन्ही खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्यांमुळे त्यांना आयपीएल खेळायला एनओसी दिलेली नाही.
इशान मलिंगाला परवानगी
दरम्यान कमिन्स टीममध्ये दाखल होत असतानाच सनरायझर्स हैदराबादला आणखी एक गूड न्यूज मिळाली आहे. श्रीलंका क्रिकेटने इशान मलिंगाला आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे, पण वानिंदू हसरंगा आणि मथिशा पथिराणा यांची फिटनेस टेस्ट झाली नसल्यामुळे या दोघांना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अजून आयपीएल खेळायला परवानगी दिलेली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 11:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : इशानला कर्णधार केलं, पण... कमिन्स पहिल्या मॅचआधीच येणार, कॅप्टन्सीवरून SRH मध्ये नवा ट्विस्ट!








