Air Canada Plane : 'प्लीज थांबा...', न्यूयॉर्क एअरपोर्टवर विमानाची ट्रकला धडक, श्वास रोखणारा CCTV
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अमेरिकेच्या न्यूयॉर्क विमानतळावर सोमवारी भीषण अपघात झाला आहे. कॅनडाच्या मॉन्ट्रियलहून आलेलं एअर कॅनडा एक्सप्रेसचं जेट विमान न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर उतरल्यानंतर एका वाहनाला धडकलं.
मुंबई : अमेरिकेच्या न्यूयॉर्क विमानतळावर सोमवारी भीषण अपघात झाला आहे. कॅनडाच्या मॉन्ट्रियलहून आलेलं एअर कॅनडा एक्सप्रेसचं जेट विमान न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर उतरल्यानंतर एका वाहनाला धडकलं. या अपघातानंतर विमान आणि वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातानंतर विमानतळ काही वेळासाठी बंद करण्यात आले. या अपघाताचं श्वास रोखून धरायला लावणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
'लागार्डिया विमानतळाच्या धावपट्टीवर एका विमानाने वाहनाला धडक दिली. अपघातानंतर आमची टीम तातडीने तिथे पोहोचली तसंच बचाव आणि शोधकार्य सुरू केलं', अशी माहिती न्यूयॉर्क अग्निशमन विभागाने दिली. तर फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार24 च्या माहितीनुसार CRJ-900 विमानाने रविवारी संध्याकाळी अंदाजे 24 मैल प्रती तास वेगाने वाहनाला धडक दिली.
विमानतळ बंद
विमान अपघातामुळे अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) लागार्डिया विमानतळावरून ये-जा करणारी सर्व विमाने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळ बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. FAA च्या सूचनेनुसार, आपत्कालीन परिस्थितीमुळे विमानतळ बंद करण्यात आले आहे.
advertisement
HORROR FOOTAGE: Video shows Air Canada Flight AC8646 colliding with a Port Authority fire truck at LaGuardia Airport.
Both pilots are dead. Dozens of passengers and two on the truck were injured.
LGA remains closed as NTSB investigates.
pic.twitter.com/QtV3CMs3Uz
— Breaking911 (@Breaking911) March 23, 2026
advertisement
अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर समोर आले आहेत. अपघात झाल्यानंतर विमानाचा पुढचा भाग वर उचलला गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे, तसंच अपघातात विमानाचं मोठं नुकसान झाल्याचंही स्पष्टपणे दिसून येत आहे.
एटीसीची ऑडिओ क्लिप व्हायरल
न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर झालेल्या अपघातानंतर एटीसीमधील एक ऑडिओ क्लिपसुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. 'माझ्याकडून चूक झाली', असा आवाज या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. तसंच 'थांब, थांब प्लीज थांब', असं एटीसी कर्मचारी म्हणत असल्याचंही ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकायला येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 11:25 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Air Canada Plane : 'प्लीज थांबा...', न्यूयॉर्क एअरपोर्टवर विमानाची ट्रकला धडक, श्वास रोखणारा CCTV









