advertisement

नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला; घटनास्थळाचा पहिला VIDEO

Last Updated:

नाशिक शहरात नांदूर नाका परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या भागात एका नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे.

News18
News18
नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदूर नाका परिसरामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये ४ ते ५ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात नांदूर नाका परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या भागात एका नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला.  नव्याने सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने चार ते पाच जण जखमी झाले आहे. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.
[video width="848" height="478" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/nashik-news-2026-03-252fc42494f4f9d60a9ed0b368b2b0da.mp4"][/video]
advertisement
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. स्लॅब खाली दबून जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने बाहेर काढण्यात आलं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. जखमी मजुरांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर काही जणांना शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. दोन जखमींवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. मात्र, इमारतीचा स्लॅब कशामुळे कोसळला याचं कारण अद्याप समोर आलं नाही. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. बचावकार्य सुरू आहे.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला; घटनास्थळाचा पहिला VIDEO
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement