IPL चा तो नियम आधी बदला... अक्षर पटेलचं थेट चॅलेंज, रोहितलाही आवडला नाही!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्याआधीच जुना नियम पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आयपीएलच्या आणखी एका कर्णधाराने या नियमाबाबत नापसंती दर्शवली आहे.
मुंबई : आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्याआधीच जुना नियम पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आयपीएलच्या आणखी एका कर्णधाराने या नियमाबाबत नापसंती दर्शवली आहे. आयपीएल 2026 च्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे, पण पहिल्या सामन्याआधीच इम्पॅक्ट सबच्या नियमावरून टीम इंडियाच्या खेळाडूने नाराजी व्यक्त केली आहे. मी स्वत: इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा चाहता नाही, या नियमामुळे ऑलराऊंडर खेळाडूंचं योगदान मर्यादित होत आहे, असं अक्षर पटेल म्हणाला आहे.
अक्षर पटेल हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात दिल्लीने धमाकेदार सुरूवात केली, पण दुसऱ्या टप्प्यात दिल्लीची कामगिरी निराशाजनक झाली आणि त्यांना प्ले-ऑफ गाठता आली नाही. मागच्या मोसमात मी कमी बॉलिंग केली, त्यामागे इम्पॅक्ट प्लेयर नियम हे कारण नव्हते, असंही अक्षर पटेलने स्पष्ट केलं.
इम्पॅक्ट प्लेअर आवडला नाही
advertisement
इम्पॅक्ट प्लेयरचा नियम 2023 पासून लागू करण्यात आला आहे. 'खरं सांगायचं तर मला हा नियम आवडत नाही, कारण मी एक ऑलराऊंडर आहे. आधी तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगसाठी ऑलराऊंडर निवडायचात, पण या नियमामुळे टीम मॅनेजमेंट ऑलराऊंडरची गरज आहे का? याचा विचार करून स्पेशलिस्ट बॅटर किंवा बॉलरला संधी देते', अशी प्रतिक्रिया अक्षर पटेलने दिली आहे. याआधी रोहित शर्मा यानेही इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली होती.
advertisement
'मी ऑलराऊंडर असल्यामुळे मला हा नियम आवडत नाही, पण त्याचवेळी नियम हे नियम असतात आणि आपल्याला त्याचं पालन करावं लागतं, पण वैयक्तिक दृष्टिकोनातून मला हा नियम आवडत नाही', असं वक्तव्य अक्षर पटेलने केलं आहे.
इम्पॅक्ट प्लेयरमुळे निराशाजनक कामगिरी?
आयपीएलच्या मागच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स टॉप-4 मध्ये पोहोचू शकली नाही, तसंच अक्षर पटेलसाठी मागचा मोसम बॉलर म्हणून निराशाजनक ठरला. अक्षरने 2018 नंतर एका मोसमात सगळ्यात कमी ओव्हर (34) टाकल्या. यात त्याने 57.60 च्या सरासरीने फक्त 5 विकेट घेतल्या. मागच्या 5 वर्षांमधील अक्षर पटेलची ही सगळ्यात वाईट सरासरी होती. अक्षर पटेलला त्याची ही कामगिरी इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे झाली का? असा प्रश्नही विचारण्यात आला, तेव्हा त्याने बोटाला दुखापत झाली होती, असं उत्तर दिलं.
advertisement
'2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आयपीएलच्या अगदी आधी होती. चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असताना माझ्या स्पिन बॉलिंग करणाऱ्या बोटाला दुखापत झाली होती. बॉलच्या सीममुळे जखम आणखी वाढत गेली, त्यामुळे मला बॉल पकडण्यात आणि स्पिन करण्यात अडचणी येत होत्या, म्हणून मी बॉलिंग कमी करत होतो. गरज असेल तेव्हाच मी बॉलिंग करायचो, 7 सामन्यांनंतर माझं बोट बरं झालं तेव्हा मी बॉलिंगला सुरूवात केली, इम्पॅक्ट प्लेयरचा नियम याला कारणीभूत नव्हता', असं अक्षर पटेल म्हणाला आहे.
advertisement
कोचचं वेगळं मत
दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक हेमांग बदानी याने मात्र इम्पॅक्ट प्लेयरबद्दल अक्षर पटेलपेक्षा वेगळं मत मांडलं आहे. 'क्रिकेट आता अशा टप्प्यावर पोहोचलं आहे, जिथे 180 रन पुरेशा नाहीत, तुम्हाला इनिंगची सुरूवात चांगली करावी लागते. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर 240-250 रन होत आहेत, मागच्या वर्षी आयपीएलमध्येही तेवढ्याच रन होत होत्या. या फॉरमॅटमध्ये क्रिकेटसाठी हाच पुढचा मार्ग आहे', असं हेमांग बदानी म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 10:24 PM IST









