MS Dhoni Retirement: ही शेवटची IPL? 'त्या' विधानाने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; म्हणाला, 'दिवसेंदिवस फिटनेस...'
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
यंदा IPL धोनीसाठी शेवटची असणार की धोनी पुन्हा एकदा मैदानात दिसणार? भारतीय क्रिकेटचा थाला म्हणजेच महेंद्रसिंह धोनी कधी निवृत्ती घेणार? हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट विश्वात चर्चेत आहे.
MS Dhoni on IPL Retirement : मार्चच्या शेवटच्या आठवड्यात IPL चे सामने सुरू होणार आहेत. गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्ष चाहत्यांना तोच प्रश्न आहे, यंदा IPL धोनीसाठी शेवटची असणार की धोनी पुन्हा एकदा मैदानात दिसणार? भारतीय क्रिकेटचा थाला म्हणजेच महेंद्रसिंह धोनी कधी निवृत्ती घेणार? हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट विश्वात चर्चेत आहे.
रविवारी चेन्नईतील चेपॉक मैदानावर झालेल्या एका खास कार्यक्रमात धोनीने या प्रश्नाला अशा काही मिश्किल शैलीत उत्तर दिलं की, उपस्थित हजारो चाहत्यांनी एकच जल्लोष केला. दाक्षिणात्य अभिनेता शिवकार्तिकेयन आणि धोनी यांच्यातील संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या एका फॅन इव्हेंटमध्ये शिवकार्तिकेयनने धोनीला विनंती केली की, "निवृत्तीची चर्चा सोडून द्या आणि तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत मैदानात खेळताना आम्हाला पाहायला मिळेल." यावर ४४ वर्षांच्या धोनीने हसत हसत उत्तर दिलं की, "६० वर्षांपर्यंत खेळणं कठीण आहे, पण मी नक्की प्रयत्न करेन!"
advertisement
धोनीच्या या एका वाक्याने स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. वयाच्या या टप्प्यावर फिटनेस टिकवणं कठीण असल्याचंही धोनीने कबूल केलं. तरी खेळण्याची जिद्द अजूनही कायम असल्याचं त्याने दाखवून दिलं. यावेळी बोलताना आपला फिटनेट हळूहळू वाढत्या वयानुसार कमी होत असल्याचंही त्याने चाहत्यांसमोर कबूल केलं.
MS DHONI ON IPL RETIREMENT AFTER IPL 2026 !!
Sivakarthikeyan — :Sir, that "Definitely Not" needs to be your permanent answer every season. You’ve got to play until you’re 60!
MS Dhoni — “My fitness is decreasing day by day but I'll try
pic.twitter.com/7lYmlOHfoz
— Indian Cricket Netwrk (@ICN_Updates01) March 22, 2026
advertisement
धोनी त्याचा १९ वा आयपीएल सीझन खेळण्यासाठी तयार आहे. 2026 च्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चाहत्यांना धोनीला खेळताना पाहायला मिळेल असं CSK चे CEO काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केलं. गायकवाडच्या नेतृत्वाखाली धोनी आता प्रामुख्याने 'फिनिशर' म्हणून खेळतोय आणि इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे त्याच्यावरचा कामाचा ताणही कमी झाला आहे.
२०२५ चं आयपीएल चेन्नईसाठी अत्यंत खराब ठरलं होतं, पॉईंट टेबलमध्ये टीम टॉप 5 मध्येही तरु शकली नाही. आता संजू सॅमसनसारख्या खेळाडूंच्या एन्ट्रीमुळे विकेटकीपरची जबाबदारी वाटली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, गायकवाडच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नव्या जोमानं टीम बांधली जाणार आहे. यावेळी IPL ची ट्रॉफी मिळवण्यासाठी टीम सज्ज झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 8:53 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MS Dhoni Retirement: ही शेवटची IPL? 'त्या' विधानाने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; म्हणाला, 'दिवसेंदिवस फिटनेस...'









