advertisement

Weather Alert: महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, चौथ्यांदा येतंय ‘ते’ संकट, 72 तासांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: मार्चमध्ये महाराष्ट्रावर उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. 22 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/7
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावर वादळी वारे, गारपीट आणि उष्णतेची लाट असं तिहेरी संकट घोंघावत आहे. आता कोकण ते विदर्भ हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. कोकण, उत्तर महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढत असून विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी संकटाचा धोका कायम आहे. आज 22 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/7
कोकणात उन्हाची तीव्रता वाढत आहे. मुंबईत आज तापमानाचा पारा 36 अंशांपर्यंत जाईल. आद्रता वाढणार असल्याने उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. आज, 22 मार्च रोजी कोणताही अलर्ट नसला तरी 23 मार्चपासून कोकणातील बहुतांश भागात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

3/7
मध्य महाराष्ट्रात देखील हवापालट झाल्याचे चित्र आहे. उन्हाचे चटके वाढले असतानाच अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा अलर्ट नाही. परंतु, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तापमान 34-37 अंशांच्या दरम्यान राहील. सोमवारपासून पुन्हा अवकाळी पावसाचा जोर वाढेल.

4/7
मराठाड्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाने हजेरी लावली. आता हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. तर सोमवारपासून पुन्हा वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपीटचा इशारा देण्यात आला आहे. तापमान 35-38 अंशांवर राहील.

5/7
विदर्भाला अवकाळी संकटानं घेरलं असून उष्णतेचा पारा देखील चांगलाच चढला आहे. आज कमाल तापमान 36-39 अंशांवर राहण्याची शक्यता आहे. नागपूरसह काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. परंतु, पावसाची शक्यता कमी राहील. 2 दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा अवकाळीचा धोका वाढणार आहे.

6/7
उत्तर महाराष्ट्रात कोरडे आणि उष्ण हवामान राहील. नाशिकसह, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांना कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. कमाल तापमान 35-37 अंश सेल्सिअसरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. पावसाची शक्यता नगण्य असून उकाडा वाढेल.

7/7
दरम्यान, महाराष्ट्रात यंदा चौथ्यांदा उष्णतेची लाट येत आहे. येत्या 2 दिवसांत पारा 2 अंशांपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. तर काही भागावरचं अवकाळी संकट कायम आहे. कोकणात उकाडा वाढेल त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement