advertisement

Pan Card अप्लाय करण्याची पद्धत बदलणार! 1 एप्रिलपासून लागू होणार नवा नियम 

Last Updated:

पॅन कार्डच्या महत्त्वाच्या नियमात येत्या 1 एप्रिलपासून बदल होणार आहे. पॅन कार्ड अप्लाय करतानाचे नियम बदलतील. हे नियम नेमके काय आहेत. चला जाणून घेऊया.

पॅन कार्ड रुल
पॅन कार्ड रुल
मुंबई : पॅन कार्ड हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे. आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्डची महत्त्वाची भूमिका असते. पण आता 1 एप्रिलपासून पॅन कार्ड तयार करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. आतापर्यंत नव्या पॅन कार्डसाठी आधार कार्डने अप्लाय करता येत होतं. मात्र 31 मार्च 2026 पर्यंतच ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. मात्र 1 एप्रिलपासून फक्त आधारने अर्ज करणे बंद होईल. सरकारने कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSC) च्या माध्यमातून अपडेट दिलेय की, ज्या लोकांनी अजुनही पॅन तयार केलेले नाही ते 31 मार्चपर्यंत फक्त आधारने अर्ज करू शकतात.
पॅन सिस्टम जास्त ट्रान्सपरेंट आणि सुरक्षित बनवण्यासाठी हा बदल केला जातोय. आधारच्या माध्यमातून व्हेरिफिकेशनने बनावट पॅन कार्ड बनवण्याची शक्यता कमी होईल. ज्यामुळे एका व्यक्तीच्या नावावर अनेक पॅन जारी होण्याची समस्याही दूर होईल. ही प्रोसेसर वेगवान आहे. ज्यामुले पॅन लवकर जारी केलं जाऊ शकेल. जुन्या प्रणालीनुसार, पॅन अर्ज प्रोसेस पूर्ण करण्यासाठी केवळ आधार हेच एकमेव साधन होते. ही जुनी सिस्टम 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहे. परंतु 1 एप्रिलपासून ती पूर्णपणे आधार-आधारित राहणार नाही.
advertisement
टॅक्स सिस्टम मजबूत करण्यासाठी बदल 
2026-27 आर्थिक वर्षापासून पॅनसाठी अर्ज करणाऱ्यांना आता आधारसोबतच जन्म तारीखचा अतिरिक्त पुरावाही द्यावा लागेल. हा बदल अधिक कठोर व्हेरिफिकेशन नियमांच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, ज्यामुळे ओळख व्हेरिफिकेशन आणखी मजबूत होईल.
advertisement
आता पॅनसाठी नाव आणि इतर डिटेल्स आधारच्या रेकॉर्ड आणि इतर डॉक्यूमेंट्सने मॅच व्हायला हवेत. हा बदल सरकारद्वारे घोषित केला गेला आहे. जेणेकरुन टेक्स सिस्टम मजबूत होईल आणि फसवणूक थांबवता येईल. हे पाऊल डिजिटल इंडियाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे सामान्य लोकांसाठी सेवा आणखी सोप्या आणि सुरक्षित बनवेल.
advertisement
कोणते डॉक्यूमेंट लागतील?
आवश्यक डॉक्यूमेंटमध्ये जन्म प्रमाण पत्र, वोटर आयडी कार्ड, 10 वीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसेन्स, पासपोर्ट आणि मजिस्ट्रेट द्वारे प्रमाणित शपथपत्राचा समावेश असू शकतो. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ओळख-संबंधित नोंदींची पडताळणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्रुटी कमी करण्यासाठी हा बदल केला जातोय.
advertisement
आणखी एक मोठा बदल नावाच्या सुसंगततेशीशी संबंधित आहे. नवीन आर्थिक वर्षापासून पॅन कार्डवर नाव पूर्णपणे आधारच्या रेकॉर्डनुसार राहील. म्हणजेच वेगवेगळ्या डॉक्यूमेंटमध्ये नवात परक असण्याची शक्यता कमी होईल. या निर्णयाचा उद्देश टॅक्सपेयर्सचा डेटा अधिक अचूक करणे हा आहे. यामुळे अनुपालन सुधारेल, परंतु विलंबामुळे अर्ज प्रक्रियेला अधिक वेळ लागू शकतो.
advertisement
पॅन कार्डसाठी ऑनलाइन अप्लाय कसा करावा?
  • सर्वात आधी NSDL च्या अधिकृत वेबसाइटव जा आणि “Apply Online” वर क्लिक करुन “New PAN – Indian Citizen (Form 49A)” निवडा.
  • यानंतर “Individual” कॅटेगिरी सिलेक्ट करा आणि आपलं नाव, जन्मतारीख, ईमेल आणि मोबाईल नंबर सारखी माहिती भरा.
  • कॅप्चा टाकून फॉर्म सबमिट करा आणि मिळालेलं टोकन नंबर नोट करा.
  • यानंतर आधार ओटीपीच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करा. आपला पत्ता आणि आई-वडिलांची माहिती भरा.
  • तुम्ही हवं असल्यास e-KYC ऑप्शन निवडू शकता. ज्यामुळे आधारचा पत्ता आपोआप जोडला जाईल.
  • यानंतर ऑनलाइन फीस भरा, पुन्हा ओटीपीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करा आणि फॉर्म सबमिट करा.
  • व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमचा पॅन कार्डजारी केला जाईल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
Pan Card अप्लाय करण्याची पद्धत बदलणार! 1 एप्रिलपासून लागू होणार नवा नियम 
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement