advertisement

पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! नव्या पर्यायी मार्गाला मंजुरी; लोणावळा-खंडाळ्याचा घाट विसरा, 'या' मार्गाने वाचणार वेळ

Last Updated:

या नवीन प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचे चित्र पूर्णपणे बदलणार असून त्याचे अनेक दूरगामी फायदे दिसून येतील.

नेरळ-शिरूर चौपदरीकरण प्रकल्पाला मंजुरी (प्रतिकात्मक फोटो)
नेरळ-शिरूर चौपदरीकरण प्रकल्पाला मंजुरी (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या एक्स्प्रेस वे आणि जुन्या महामार्गावरील वाहतुकीचा ताण आता कायमचा हलका होणार आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, नेरळ-शिरूर चौपदरीकरण प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात आडोशी बोगद्याजवळ झालेल्या टँकर अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे तब्बल ३२ तास ठप्प होता. अशा आपत्कालीन स्थितीत पर्यायी मार्ग नसल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. हीच बाब लक्षात घेऊन कोल्हे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे या नव्या मार्गाची मागणी केली होती.
असा असेल नवा मार्ग:
हा प्रस्तावित मार्ग उरण-कर्जत-नेरळ-वांद्रे-पाईट-शिरोली-पाबळ-मलठण ते शिरूर असा असेल. विशेष म्हणजे, माळशेज घाट आणि बोरघाट यांच्यातील ६० किलोमीटरच्या अंतरात हा नवा सक्षम पर्याय उभा राहणार आहे.
advertisement
या नवीन प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचे चित्र पूर्णपणे बदलणार असून त्याचे अनेक दूरगामी फायदे दिसून येतील. प्रामुख्याने, या मार्गामुळे तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर यांसारख्या औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटण्यास मदत होईल, ज्यामुळे येथील कंपन्यांच्या मालाची ने-आण अधिक वेगाने होईल. केवळ स्थानिकच नव्हे, तर हा मार्ग मुंबई-छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई-सोलापूर या प्रमुख शहरांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे, ज्यामुळे राजंतर्गत कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.
advertisement
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्रीच्या दुर्गम रांगांमधून विकसित केला जाणारा सुमारे २० किलोमीटर लांबीचा नवा पर्यायी घाटमार्ग. या घाटासाठी सध्या केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाची तांत्रिक परवानगी मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. एकदा का हा प्रकल्प पूर्ण झाला की, चाकणमधील आयटी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील अवजड वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल आणि पुणे-मुंबई प्रवासाचा एक आधुनिक आणि वेगवान नवा अध्याय खऱ्या अर्थाने सुरू होईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! नव्या पर्यायी मार्गाला मंजुरी; लोणावळा-खंडाळ्याचा घाट विसरा, 'या' मार्गाने वाचणार वेळ
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement