advertisement

Car Tyre: उन्हाळ्यात असतो कारचे टायर फुटण्याचा धोका! जीवावरही बेतू शकतं, अशी घ्या काळजी

Last Updated:
उन्हाळा सुरू झाला आहे. भारतीय रस्यांवर कारचे टायर फुटण्याची समस्या निर्माण होते. आज आपण असं होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे पाहणार आहोत.
1/9
उन्हाळा सुरू झाला की, भारतीय रस्ते हे प्रचंड तापतात. ज्यामुळे गाड्यांच्या टायरसंबंधित समस्या या सुरू होतात. अनेकदा टायर पंचर होणे किंवा फुटण्याच्या घटना समोर येतात. ज्यामुळे आपल्या जीवावरही बेतू शकतं. म्हणूनच हे टायर का फुटू शकतात आणि उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतं.

2/9
उन्हाळ्यात टायरला प्रॉब्लम का येते? : भारतातील अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात तापमान हे 40 डिग्री सेल्सियसहून वर जाते. रस्ते हे जास्त गरम होतात. कार सतत अशाच रस्त्यांवरुन जात असतात तेव्हा टायरमध्ये उष्णता जमा होऊ लागते.यामुळे हवेता दबाव वाढतो आणि रबर नरम आणि कमकुवत होते. टायरचा भाग आधीच घासलेला असेल तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. ज्यामुळे टायर फेल होण्याचा धोका वाढतो.

3/9
टायरमध्ये चुकीचं प्रेशर किती धोकादायक? : टायर फुटण्यामागचं सर्वात सामान्य कारण म्हणजे, चुकीचं एयर प्रेशर. अनेक ड्रायव्हर नकळत टायरमध्ये गरजेपेक्षा जास्त हवा किंवा कमी हवा भरून गाडी चालवतात.जास्त हवा भरलेल्या टारमध्ये उष्णता जास्त संवेदनशील होते. तापमान वाढल्यावर टायरच्या आत हवा पसरते आणि दबाव वाढतो. ज्यामुळे अचानक टायर फुटू शकते.तसंच कमी हवेचे टायर जास्त खाली बसतात, ज्यामुळे अतिरिक्त उष्णता निर्माण होते. काही काळानी यामुळे टायरची संरचना कमकुवत होते.

4/9
योग्य एयर प्रेशर ठेवण्याची सोपी पद्धत? : सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे, कंपनीने सांगितलेल्या एयर प्रेशरचे पालन करा. प्रत्येक दोन आठवड्यात एकदा टायर प्रेशर चेक करणे फायदेशीर ठरते. लांबच्या प्रवासापूर्वी तर हे करायलाच हवे. एका लहान सवयीमुळे मोठा अपघात टाळला जाऊ शकतो.

5/9
जुन्या टायरमध्ये उष्णता का पसरते? : अनेकदा टायर बाहेरुन चांगले दिसतात. मात्र त्याचे रबर हे खराब झालेले असता. भारतात पाच-सहा वर्षे जुन्या टायर्सवर गाडी चालवणे सामान्य आहे. अशा उष्ण वातावरणात टायर सहज फेल होऊ शकतात.साइडवॉलवर लहान क्रॅक, फुगवटा किंवा असामान्य घासलेले दिसले तर दुर्लक्ष करू नका. हे टायर फेल होण्याचे सुरुवातीचे लक्षणं असू शकतात.

6/9
जास्त वजन टायरवर काय परिणाम टाकते? : फॅमिली ट्रिप दरम्यान गाडीमध्ये जास्त सामान आणि प्रवासी असल्याने ओव्हरलोडिंग होते. अतिरिक्त वजन म्हणजे टायरवर जास्त दबाव पडतो आणि जास्त उष्णता निर्माण होते. लोड ठरलेल्या मर्यादेत ठेवल्याने टायरचे वय वाढते आणि फुटण्याचा धोका कमी होतो.

7/9
वेग आणि लाँग ड्राइव्हचा संबंध काय? : जास्त स्पीडवर टायर वेगाने फिरतात. ज्यामुळे उष्णताही जास्त निर्माण होते. दुपारच्या उन्हात मोठ्या हायवेवर ड्राइव्ह करणे टायरसाठी कठीण असते. अधुन-मधून ब्रेक घेणे फायदेशीर ठरते. जेणेकरुन टायर गार होण्यास वेळ मिळू शकेल.

8/9
नियमित तपासणी का आवश्यक? : टायर नियमित तपासण्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. लहानचा खिळा किंवा छोटा कटही गंभीर ठरू शकतो. उन्हाळ्यात अशा लहान चुकांमुळे देखील टायर फेल होण्याचा धोका वाढतो.

9/9
व्हील अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग महत्त्वाची : खराब व्हील अलाइनमेंटमुळे टायर प्रचंड घासतात आणि अशा परिस्थितीत ते लवकर गरम होतात. अनेक ड्रायव्हर याकडे लक्षच देत नाहीत. नियमित सर्व्हिसिंग, योग्य अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंगमुळे टायर चांगल्या परिस्थितीत राहतात आणि उन्हाल्यात फेल होण्याची जोखिम कमी होते.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement