Iran Attack US: ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणचं ड्रोनने उत्तर, बगदादमधील अमेरिकन दूतावासावर थेट ड्रोन हल्ला, पाहा VIDEO
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
इराणच्या ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ल्यांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या आखाती देशांमधील महत्त्वाची ठिकाणे उद्धवस्त झाली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराण धमकी देत असताना दुसरीकडे इराणनं बगदादमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला केला आहे.
तेहरान/बगदाद: अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारुन आता १८ दिवस झाले आहेत. दोन देशांकडून होत असलेल्या हल्ल्याला इराणकडून जोरदार प्रत्यु्त्तर सुरू आहे. इराणच्या कडव्या प्रतिकाराने अमेरिका-इस्रायल हतबल झाले आहेत. इराणच्या ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ल्यांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या आखाती देशांमधील महत्त्वाची ठिकाणे उद्धवस्त झाली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराण धमकी देत असताना दुसरीकडे इराणनं बगदादमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला केला आहे.
मध्यपूर्वेतील संघर्ष आता एका भयानक वळणावर येऊन ठेपला आहे. इराणने बगदाद येथील अमेरिकन दूतावासाला लक्ष्य केले असून, दुसरीकडे इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अत्यंत महत्त्वाच्या तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ले चढवले आहेत. या हल्ल्यांमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर संकट निर्माण झाले असून युद्धाची ही ठिणगी आता संपूर्ण अरब जगताला कवेत घेत आहे.
advertisement
अमेरिकन दूतावासावर भीषण ड्रोन हल्ला
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर समोर आलेल्या एका व्हिडिओनुसार, इराकची राजधानी बगदाद येथील अमेरिकन दूतावास परिसरात एक स्फोटक ड्रोन धडकले. दूतावासाच्या आवारात पडल्यानंतर या ड्रोनचा मोठा स्फोट झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
IRAQI FILM MOMENT DRONE GOES THROUGH US EMBASSY, GREEN ZONE ROCKED BY HUGE BLAST https://t.co/8ujUP0W9h0 pic.twitter.com/PvKYqaYS6v
— RT (@RT_com) March 17, 2026
advertisement
या हल्ल्याव्यतिरिक्त बगदादमधील अल-जादिरिया भागात एका घरावर मिसाइल हल्ला झाला, ज्यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, मारले गेलेले लोक इराण समर्थित गटांचे सल्लागार असल्याची माहिती समोर आली आहे.
युएईमधील तेल टँकरवर इराणचे हल्ले...
दरम्यान सोमवारी, इराणने यूएईमधील 'फुजैराह ऑइल इंडस्ट्रीज' आणि अबू धाबीमधील 'शाह गॅस फील्ड'वर ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे दोन्ही ठिकाणी मोठी आग लागली असून ऑपरेशन्स तूर्तास बंद करण्यात आले आहेत. फुजैराह हे तेल निर्यातीसाठीचे महत्त्वाचे बंदर मानले जाते. या बंदरातून होर्मुजची सामुद्रधुनी वळसा घालून व्यापार करता येतो. इराणने आधीच होर्मुजची सामुद्रधुनी बंद केली असल्याने आता हा पर्यायी मार्गही हल्ल्यानंतर धोक्यात आला आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Mar 17, 2026 8:59 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran Attack US: ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणचं ड्रोनने उत्तर, बगदादमधील अमेरिकन दूतावासावर थेट ड्रोन हल्ला, पाहा VIDEO









