54 रुपयांनी पेट्रोल महाग; तर LPG चे 300 रुपयांनी वाढले दर पण कुठे आणि मुंबई-पुण्यात काय स्थिती?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अनेक ठिकाणी क्रूडचा मर्यादीत साठा, LPG चा तुटवडा जाणवू लागला आहे. या युद्धाच्या झळा थेट पोहोचत नसल्या तरी अप्रत्यक्षपणे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत.
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण चालेला संघर्ष कधी थांबणार याची वाट संपूर्ण जग पाहात आहे. केवळ भूमीवरच नाही तर सागरातही सुरू असलेल्या या संघर्षाच्या झळा आता विकसनशील देशांना बसायला लागल्या आहेत. भारतासह अनेक ठिकाणी क्रूडचा मर्यादीत साठा, LPG चा तुटवडा जाणवू लागला आहे. या युद्धाच्या झळा थेट पोहोचत नसल्या तरी अप्रत्यक्षपणे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले
इराण आणि इस्रायलमधील संघर्षाचा मोठा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागला आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये इंधनाच्या दरात एका रात्रीत ऐतिहासिक दरवाढ करण्यात आली. तिथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तब्बल ५४ रुपयांपर्यंत वाढ झाली असून घरगुती गॅस सिलिंडरचे दरही ३०० रुपयांनी वाढले आहेत. नेपाळ ऑईल निगमने रविवारी रात्री उशिरा घेतलेल्या बैठकीनंतर इंधन दरवाढीचा मोठा निर्णय घेतला.
advertisement
नेपाळमध्ये भीषण परिस्थिती
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे कारण देत नेपाळने ही दरवाढ लागू केली आहे. नेपाळमध्ये स्वतःची कोणतीही ऑईल रिफायनरी नाही, त्यामुळे नेपाळ आपल्या १०० टक्के इंधन गरजेसाठी भारतावर आणि इंडियन ऑईलवर अवलंबून आहे. जागतिक संकट काळातही इंधन पुरवठा सुरळीत ठेवल्याबद्दल नेपाळने भारताचे आभार मानले.
नेपाळमध्ये पेट्रोल डिझेलचे नवे दर
पेट्रोल: ३१ रुपयांनी महागले नव्या दरानुसार १८८ रुपये प्रति लीटर प्रति लीटर मागे मोजावे लागणार आहे
advertisement
डिझेल: तब्बल ५४ रुपयांनी महागले असून नव्या दरानुसार १९६ रुपये प्रति लीटर मिळणार आहे
LPG सिलिंडर: २९६ रुपयांनी महाग झाला असून नव्या दरानुसार २,१२६ रुपये प्रति सिलिंडर रुपये मोजावे लागणार आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
शेजारील देशात एवढी मोठी दरवाढ झाल्याने महाराष्ट्रातील वाहनचालकांच्या मनात धडधड वाढली आहे. मात्र, दिलासादायक बाब अशी की मुंबई आणि पुण्यात सध्या तरी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. भारतात इंधन दर स्थिर असले तरी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी चढ-उतार पाहता भविष्यात काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
क्रूड ऑइलच्या किंमती घरसल्या
महाराष्ट्रात काही ठिकाणी 105 रुपये प्रति लीटर पेट्रोल आहे. तर मुंबई १०३.४४ डिझेलचे दर ८९.९७ रुपये आहेत. तर पुण्यातही १०५ रुपयांच्या आसपास पेट्रोलचे दर प्रति लीटर आहेत. डिझेल 91 रुपयांच्या जवळपास पोहोचलं आहे. सध्या महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. दर स्थिर असल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. क्रूड ऑइलच्या दरात किंचित फरक झाला आहे. दर घसरले असून 103.01 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 7:45 AM IST
मराठी बातम्या/देश/
54 रुपयांनी पेट्रोल महाग; तर LPG चे 300 रुपयांनी वाढले दर पण कुठे आणि मुंबई-पुण्यात काय स्थिती?








