Navi Mumbai : कधी खुला होणार खारघर-तुर्भे लिंक रोड? मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली,म्हणाले...
Last Updated:
Kharghar-Turbhe Link Road: गेल्या काही दिवसांपासून खारघर-तुर्भे लिंक रोडचे काम वेगाने सुरू आहे. सध्या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरु झालेले आहे, त्यातील सर्वात चर्चेत असलेल्या एका मार्गाची महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर आलेली आहे.
प्रवासाचा वेळ वाचणार
नवी मुंबईमधील अनेक उपनगरात त्यातही खारघर आणि तुर्भेदरम्यान गेल्या काही काळापासून उद्योग वाढलेले असल्याने लोकांचे कामानिमित्ताने स्थलांतर या शहरात वाढलेले आहेत. परिणामी येथील वाहतूककोंडी वाढलेली आहे,त्यामुळे या समस्येवर सुटका मिळवण्यासाठी 'खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड' प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे.
खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड प्रकल्पामुळे तुर्भे, जुईनगर, सानपाडा आणि खारघर परिसरातील रहिवाशांना तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर सिडकोच्या वतीनेच तुर्भे आणि खारघर नोडला थेट असा जोडणारा हा प्रकल्प हाती घेतला आहे. ज्यात हा तब्बल चार पदरी मार्ग तयार करण्यात येणार आहे.
advertisement
कसा असेल हा मार्ग?
1)मिळालेल्या माहितीनुसार खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड मार्ग हा जुईनगर रेल्वे स्थानकासमोरील शीव-पनवेल द्रुतगती महामार्गापासून खारघर येथील सेंट्रल पार्क उद्यानापर्यंत असा असणार आहे. जो साधारण 5.940 किमीचा असणार आहे.
2)विशेष म्हणजे या मार्गात सुमारे 1.763 किमीचा बोगदाही असणार असून राहिलेला भाग हा उड्डाणपूल आणि सरळ मार्गाने जोडण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊयात हा मार्ग वाहतूकीसाठी कधीपासून खुला करण्यात येणार आहे.
advertisement
कधी होणार वाहतूकीसाठी खुला?
हा मार्ग फक्त तुर्भे ते खारघर दरम्यानचा प्रवास सोपा किंवा अंतर कमी करणार नसून यामुळे नवी मुंबई, रायगड आणि पनवेल या जिल्ह्यातील प्रवाशांच्या दररोजच्या प्रवासाला मोठा सोपा करणार आहे. या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सिडकोकडून आणि सरकारकडून 2028 पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात येणार आहे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 7:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : कधी खुला होणार खारघर-तुर्भे लिंक रोड? मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली,म्हणाले...










