शनि अस्त होताच ४ राशींचे नशीब पालटलं! पुढील ४० दिवस सर्वात सुखाचे, पैसा सुखशांती मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shani Asta 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफळदाता मानले जाते. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून शनीची ओळख आहे.
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफळदाता मानले जाते. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून शनीची ओळख आहे. त्यामुळे शनिच्या स्थितीत किंवा गतीत होणारा प्रत्येक बदल सर्व राशींवर काही ना काही परिणाम घडवून आणतो. ज्योतिष गणनेनुसार 13 मार्च 2026 रोजी शनि मीन राशीत अस्त झाला असून हा कालावधी अनेक राशींसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. शनि 22 एप्रिल 2026 पर्यंत मीन राशीत अस्त अवस्थेत राहणार असल्यामुळे काही राशींना या काळात सकारात्मक संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शनिच्या अस्ताचा कालावधी
ज्योतिषशास्त्रानुसार 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी शनि मीन राशीत अस्त होईल. साधारणतः सुमारे 40 दिवस हा प्रभाव कायम राहणार आहे. त्यानंतर 22 एप्रिल 2026 रोजी पहाटे 4 वाजून 49 मिनिटांनी शनि पुन्हा उदयाला येईल. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, या काळात अनेकांना रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. काहींसाठी हा काळ आत्मपरीक्षण आणि नियोजन करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो.
advertisement
‘या’ राशींसाठी अनुकूल काळ
मेष रास
मेष राशीच्या व्यक्तींना शनिच्या अस्ताचा आर्थिक बाबतीत लाभदायक परिणाम दिसू शकतो. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असले तरी उत्पन्नाच्या बाबतीत स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. तसेच दीर्घकाळ प्रलंबित असलेली काही कामे पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल. विशेष म्हणजे या राशीवर साडेसातीचा प्रभाव नसल्याने तुलनेने हा काळ हलका आणि सकारात्मक मानला जात आहे.
advertisement
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा कालावधी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता असून वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना अप्रत्यक्षरीत्या आर्थिक फायदा होण्याचे संकेत आहेत. एकूणच शनिच्या अस्तामुळे या राशीला सकारात्मक परिणाम जाणवू शकतात.
कुंभ रास
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या अनुकूल राहू शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत स्थैर्य टिकून राहण्यास मदत होईल. तसेच कामानिमित्त परदेश प्रवासाची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात काही मोठी जबाबदारी किंवा आव्हान स्वीकारण्याची संधीही मिळू शकते.
advertisement
मीन रास
शनि मीन राशीतच अस्त होणार असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. मानसिक तणाव कमी होण्यास मदत होईल आणि नवीन कामे किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी वातावरण अनुकूल राहील. विचार करण्याची पद्धत अधिक सकारात्मक होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना संयम आणि विचारपूर्वक भूमिका घेतल्यास चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 6:38 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
शनि अस्त होताच ४ राशींचे नशीब पालटलं! पुढील ४० दिवस सर्वात सुखाचे, पैसा सुखशांती मिळणार










