March Horoscope: फुल्ल तयारीत राहा! 15 मार्चपासून या 3 राशींचे नशीब पालटणार; सूर्यासह तीन ग्रहांचा वरदहस्त
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांची राशी आणि नक्षत्र बदलण्याची क्रिया सर्वच राशींच्या आयुष्यात मोठे फेरबदल घडवून आणत असते. मार्च महिन्यात लवकरच एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून येत आहे. या दिवशी सूर्य, शुक्र आणि चंद्र हे तिन्ही महत्त्वाचे ग्रह एकाच दिवशी आपापल्या नक्षत्रात किंवा राशीत गोचर करणार आहेत.
द्रिक पंचांगानुसार, 15 मार्च 2026 रोजी ग्रहांचा राजा सूर्य पहाटे 1 वाजून 8 मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करेल. याच दिवशी पहाटे 4 वाजून 48 मिनिटांनी चंद्र श्रवण नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर, पैसेवाला ग्रह म्हणजे शुक्र सकाळी 10 वाजून 43 मिनिटांनी रेवती नक्षत्रात जाईल. एकाच दिवसात होणारे हे तीन मोठे बदल काही राशींसाठी नशिबाची दारे उघडणारे ठरणार आहेत.
advertisement
advertisement
advertisement
कन्या रास - कन्या राशीसाठी या ग्रहांची स्थिती सुवर्णसंधी घेऊन आली आहे. मार्च महिन्यात तुम्हाला मानसिक तणावातून मोठी सुटका मिळेल. गेल्या काही काळापासून नात्यात आलेला दुरावा किंवा मित्रमंडळींमधील मतभेद मिटवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील, ज्यामुळे तुमच्या अनुभवात भर पडेल. जर तुम्ही घर, जमीन किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ फायदेशीर ठरेल. मात्र, कोणताही मोठा निर्णय घेताना घरातील अनुभवी आणि मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेणे कधीही हिताचे ठरेल.
advertisement
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य, शुक्र आणि चंद्राचा हा त्रिवेणी संयोग नवीन कामांच्या संधी घेऊन येईल. 15 मार्चनंतर तुम्ही व्यापारात घेतलेले धाडसी निर्णय तुम्हाला भविष्यात मोठा आर्थिक फायदा करून देतील. तुमचे जुने रखडलेले व्यवहार किंवा सौदे आता पुन्हा सुरू होतील आणि त्यातून धनलाभ होईल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ थोडा नाजूक असू शकतो, त्यामुळे जोडीदाराशी संवाद साधताना स्वतःहून पुढाकार घ्या. बोलताना संयम आणि नम्रता ठेवल्यास तुमची लव्ह लाईफ अधिक सुखकर होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







