advertisement

Donald Trump Iran School Attack: ट्रम्प यांना त्यांच्या सैन्यानं खोटं पाडलं! इराणच्या १७५ चिमुरड्यांना कोणी संपवलं? समोर आली धक्कादायक माहिती

Last Updated:

US Army Report On Iran School Attack : २८ फेब्रुवारी रोजी इराणमध्ये झालेल्या भीषण हवाई हल्ल्याबाबत आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणवरील हल्ल्यात १७५ लहान शालेय मुलींचा मृत्यू झाला होता

ट्रम्प यांना त्यांच्या सैन्यानं खोटं पाडलं! इराणच्या १७५ चिमुरड्यांना कोणी संपवलं?  समोर आली धक्कादायक माहिती
ट्रम्प यांना त्यांच्या सैन्यानं खोटं पाडलं! इराणच्या १७५ चिमुरड्यांना कोणी संपवलं? समोर आली धक्कादायक माहिती
तेहरान/वॉशिंग्टन: इस्रायल-अमेरिकेने इराणविरोधात युद्ध पुकारून आता १२ दिवस उलटून गेले आहेत. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना इराणकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. या सगळ्या घडामोडीत मोठी माहिती समोर आली आहे. २८ फेब्रुवारी रोजी इराणमध्ये झालेल्या भीषण हवाई हल्ल्याबाबत आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणवरील हल्ल्यात १७५ लहान शालेय मुलींचा मृत्यू झाला होता. हा हल्ला अमेरिका-इस्रायलने केला होता. तर, या दोन्ही देशांनी इराणकडे बोट दाखवलं होतं. या हल्ल्याची अमेरिकन लष्कराकडून चौकशी सुरू होती.
इराणच्या शाळेत असलेल्या १७५ मुलींच्या मृत्यूसाठी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे स्पष्ट झाले आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्या अहवालानुसार, अमेरिकन लष्कराने चुकून एका प्राथमिक शाळेला इराणचा लष्करी तळ समजून लक्ष्य केले असल्याचे म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

२८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू असताना अमेरिकेने इराणवर टॉमहॉक मिसाइलने हल्ला चढवला होता. 'शजराह तैय्येबेह' या प्राथमिक शाळेची इमारत अमेरिकेच्या टार्गेट लिस्टमध्ये होती. मात्र, अमेरिकन लष्कराला असे वाटले होते की हा इराणचा लष्करी तळ आहे. प्रत्यक्षात, ही इमारत पूर्वी लष्कराचा भाग होती, परंतु अनेक वर्षांपासून तिथे शाळा भरत होती.
advertisement

जुन्या माहितीचा आधार घेणं पडलं महागात

तपासातून समोर आले आहे की, अमेरिकन सेंट्रल कमांडने ज्या कोऑर्डिनेट्सवर (Coordinates) हल्ला केला, ते 'डिफेंस इंटेलिजेंस एजेंसी'ने दिलेल्या जुन्या माहितीवर आधारित होते. ही माहिती पुन्हा क्रॉस-चेक न करताच क्षेपणास्त्र डागण्यात आले. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा शाळा सुटली होती आणि पालक आपल्या मुलांना घरी नेण्यासाठी शाळेत पोहोचले होते. याच दरम्यान झालेल्या हल्ल्यात १७५ निष्पाप मुलींना प्राण गमवावे लागले.
advertisement

ट्रम्प यांच्या विधानामुळे गुंता वाढला

सुरुवातीला अमेरिका या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार देत होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर या हल्ल्यासाठी इराणच जबाबदार असावा, असे विधान केले होते. मात्र, आता अमेरिकन लष्कराच्या अंतर्गत तपासानेच ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे क्षेपणास्त्र अमेरिकेचेच होते आणि टार्गेट निवडण्यात मोठी चूक झाली होती हे समोर आलं आहे.
advertisement

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump Iran School Attack: ट्रम्प यांना त्यांच्या सैन्यानं खोटं पाडलं! इराणच्या १७५ चिमुरड्यांना कोणी संपवलं? समोर आली धक्कादायक माहिती
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement