SSC Exam Paper Leak: बोर्डाचा पेपर आहे की मस्करी! दहावीचा गणिताचा पेपर चक्क ३ दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर व्हायरल
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
SSC Maths Paper Leak : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गणित भाग-१ आणि भाग-२ या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच 'टेलिग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. बारावीच्या परीक्षेतही पेपर फुटीचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर आता दहावीचाही पेपर फुटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
तीन दिवस आधीच पेपर फुटला...
मिळालेल्या माहितीनुसार, एका टेलिग्राम ग्रुपवर गणिताचे दोन्ही पेपर पोस्ट करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, गणित भाग-२ चा पेपर चक्क परीक्षेच्या तीन दिवस आधीच या ग्रुपवर टाकण्यात आला होता. सुरुवातीला या अफवा असल्याची चर्चा होती, मात्र बोर्डाने गांभीर्याने घेत याची शहानिशा केली.
बोर्डाकडून पडताळणी आणि पुष्टी
advertisement
टेलिग्रामवर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिका आणि बोर्डाची अधिकृत प्रश्नपत्रिका यांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत दोन्ही प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पेपर फुटल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले असून बोर्डाचे पेपर किती सुरक्षित आहेत, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पोलीस कारवाई आणि तांत्रिक तपास
या गंभीर प्रकाराची दखल घेत पुणे विभागीय मंडळाने तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित टेलिग्राम ग्रुपचे अॅडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. हा पेपर नेमका कुठून आणि कोणी लीक केला, याचे मूळ शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
advertisement
या गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस आता या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी वेगाने हालचाली करत आहेत.
बारावीचेही पेपर फुटले...
हाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत नागपूर विभागात रसायनशास्त्र (Chemistry), भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Mathematics) या विषयांचे पेपर फुटल्याचे प्रकार समोर आले आहेत. परीक्षेपूर्वी व्हॉट्सॲपवर पेपर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणीत गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना अटकही झाली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 8:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SSC Exam Paper Leak: बोर्डाचा पेपर आहे की मस्करी! दहावीचा गणिताचा पेपर चक्क ३ दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर व्हायरल








